कन्हैय्या कुमार प. बंगालच्या निवडणुकीत करणार कम्युनिस्ट पार्टीचा प्रचार
By Admin | Updated: March 4, 2016 17:27 IST2016-03-04T17:27:00+5:302016-03-04T17:27:40+5:30
एका रात्रीत देशभर प्रसिद्धी मिळालेला कन्हैय्या कुमार पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या प्रचारासाठी उतरणार आहे

कन्हैय्या कुमार प. बंगालच्या निवडणुकीत करणार कम्युनिस्ट पार्टीचा प्रचार
ऑनलाइन लोकमत
कोलकाता, दि. 4 - एका रात्रीत देशभर प्रसिद्धी मिळालेला कन्हैय्या कुमार पश्चिम बंगालमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या प्रचारासाठी उतरणार आहे. डाव्या पक्षांना पाठिंबा देणाऱे सगळे विद्यार्थी प्रचारात सहभागी होतील, त्यात कन्हैय्याही असेल असेल सीताराम येचुरी यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांमध्ये कुठलेही गैरप्रकार होणार नाहीत आणि त्या नि:पक्षपातीपणे घेण्यात येतील अशी आपल्याला केंद्र सरकारकडून हमी हवी असल्याचे येचुरी म्हणाले. ही निवडणुक हिंसाचारमुक्त असावी अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे.
तसेच, या निवडणुकीमध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या मागे असलेली विद्यार्थ्यांची ताकद भारताला दिसेल असा दावाही येचुरी यांनी केला आहे.
यावेळी केरळमध्ये डावे पक्ष सत्ता स्थापन करतिल आणि भ्रष्टाचारमुक्त प्रशासन देतील असा दावाही येचुरी यांनी केला.
पश्चिम बंगालमध्ये 4 एप्रिल ते 5 मे या कालावधीत सहा फेऱ्यांमध्ये 294 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
याआधी कन्हैय्याविषयी बोलताना भाजपाचे ज्येष्ठ नेते व्यंकय्या नायडू यांनी त्याने अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे आणि राजकारणापासून दूर रहावे असा सल्ला दिला आहे. जर त्यांना राजकारणच करायचे असेल तर त्यांनी अभ्यास सोडावा आणि राजकारणात उतरावे असे ते म्हणाले.
Kanhaiya sahit jitne bhi Left ke sakriya karyakarta hain wo sab bhaag lenge: Sitaram Yechury on whether Kanhaiya Kumar will campaign in WB
— ANI (@ANI_news) March 4, 2016