हिमाचल प्रदेशमध्ये मोदींच्या रॅलीसाठी जाणाऱ्या स्कूल बसला अपघात, 35 विद्यार्थी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 13:55 IST2018-12-27T13:52:44+5:302018-12-27T13:55:01+5:30
हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली होणार आहे.

हिमाचल प्रदेशमध्ये मोदींच्या रॅलीसाठी जाणाऱ्या स्कूल बसला अपघात, 35 विद्यार्थी जखमी
शिमलाः हिमाचल प्रदेशच्या धर्मशाळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची रॅली होणार आहे. या रॅलीसाठी विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या स्कूल बसला अपघात झाला आहे. बस पलटून जवळपास 35 मुलं जखमी झाली आहेत. तर 5 मुलांची प्रकृती अत्यंत गंभीर आहे. कॉम्प्युटर सेंटरची सर्व मुलं धर्मशाळेत मोदींच्या रॅलीमध्ये भाग घेण्यासाठी जात आहेत.
हिमाचल प्रदेशमध्ये भाजपाच्या सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. गंभीर मुलांना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, जखमींवर उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नगरोटा सुरियामधल्या कॉम्प्युटर सेंटरमधले स्किल डेव्हलपमेंटचे विद्यार्थी मोदींच्या रॅलीमध्ये सहभाग घेण्यासाठी जात होते. 32 आसनी या स्कूल बसमध्ये जवळपास 45 प्रवासी मुलं बसली होती. स्थानिकांच्या मदतीनं अपघातग्रस्त मुलांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
#HimachalPradesh: 35 students injured in school bus accident near Lunj in Kangra; injured students admitted to a hospital pic.twitter.com/ctng6b8sMa
— ANI (@ANI) December 27, 2018