भाजपाच्या खासदार कंगना राणौत यांनी काँग्रेस नेते राहुल गांधींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. जर राहुल गांधी स्वतःची तुलना अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी करत असतील तर त्यांनी भाजपामध्ये सामील व्हावं. देवाने तुम्हाला (राहुल गांधी) जीवन दिलं आहे, तुम्हीही अटलजी बनू शकता, तुम्ही भारतीय जनता पक्षात सामील व्हा असं कंगना यांनी म्हटलं आहे.
लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दावा केला की, मोदी सरकार परदेशी पाहुण्यांना विरोधी पक्षनेत्यांना भेटण्यापासून रोखत आहे. रशियाचे व्लादिमीर पुतिन यांच्या भारत भेटीच्या काही तास आधी ते म्हणाले, "सर्वसाधारणपणे, भारतात येणारे परदेशी पाहुणे विरोधी पक्षनेत्याला भेटतात अशी परंपरा आहे. अटल बिहारी वाजपेयी आणि मनमोहन सिंग यांच्या काळातही असंच घडलं होतं."
"आजकाल, जेव्हा कोणी परदेशातून येतं किंवा मी बाहेर जातो तेव्हा सरकार असं सुचवतं की तेथील लोकांनी विरोधी पक्षनेत्याला भेटू नये." राहुल गांधींच्या याच विधानावर कंगना राणौतने प्रतिक्रिया दिली आहे. तसेच भाजपामध्ये सामील होण्याचा सल्लाही दिला.
"सरकारचे स्वतःचे निर्णय असतात... संपूर्ण देशाला अटलजींचा अभिमान होता. ते देशभक्त होते. मला यामागील कारण माहित नाही, पण मी माझा दृष्टिकोन मांडत आहे. त्यांच्या (राहुल गांधींच्या) देशाबद्दलच्या भावना देखील खूप शंका येण्यासारख्या आहेत. मग ते दंगली असोत किंवा देशाचे विभाजन करण्याचं षड्यंत्र असो... त्यांना माझा एकमेव सल्ला म्हणजे भारतीय जनता पक्षात सामील व्हा" असं कंगना राणौत यांनी म्हटलं आहे.
Web Summary : BJP MP Kangana Ranaut advises Rahul Gandhi to join BJP if he compares himself to Atal Bihari Vajpayee. She criticizes his patriotism and suggests this move given his questionable sentiments towards the nation.
Web Summary : भाजपा सांसद कंगना रनौत ने राहुल गांधी को अटल बिहारी वाजपेयी से तुलना करने पर भाजपा में शामिल होने की सलाह दी। उन्होंने उनकी देशभक्ति पर सवाल उठाया और देश के प्रति उनकी संदिग्ध भावनाओं को देखते हुए यह सुझाव दिया।