शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

संजय राऊत पुन्हा कंगनाच्या निशाण्यावर; म्हणाली, ...येथून पैसा कमावणाऱ्यांना हरामखोर म्हटलं जाणार नाही

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 1, 2020 13:04 IST

कंगना रणौतने पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. कंगनाने आपल्या एका ट्विटमध्ये हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या 'भूत पुलिस' या चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित न्यूज आर्टिकल शेअर करत लिहिले आहे...

ठळक मुद्देकंगना रणौतने पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.देव भूमी प्रत्येक भारतीयाची आहे आणि कुणी या राज्यातून पैसे कमवत असेल, तर त्याला 'हरामखोर' अथवा 'नमकहराम' म्हटले जाणार नाही - कंगनाकंगनाच्या ट्विटवरून भडकलेल्या संजय राऊतांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाला हरामखोर मुलगी, असे म्हटले होते.

नवी दिल्ली - कंगना रणौतने पुन्हा एकदा शिवसेना नेते संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. कंगनाने आपल्या एका ट्विटमध्ये हिमाचल प्रदेशात सुरू असलेल्या 'भूत पुलिस' या चित्रपटाच्या शूटिंगशी संबंधित न्यूज आर्टिकल शेअर करत लिहिले आहे, "सध्या हिमाचल मुंबईच्या अनेक फिल्म यूनिट्सचे होस्टिंग करत आहे. देव भूमी प्रत्येक भारतीयाची आहे आणि कुणी या राज्यातून पैसे कमवत असेल, तर त्याला 'हरामखोर' अथवा 'नमकहराम' म्हटले जाणार नाही. जर, असे कुणी म्हणत असेल तर, मी त्याची निंदा करते, बॉलीवुड प्रमाणे गप्प बसणार नाही."

राऊत कंगनाला म्हणाले होते हरामखोर -कंगना रणौत ने गेल्या महिन्यात सुशांत सिंह राजपूत केसवरून मुंबई पोलिसांवर टीका केली होती. एवढेच नाही, तर तिने संजय राऊतांवर तिला मुंबईमध्ये न येण्याची धमकी देण्याचा आरोपही केला होता. तसेच मुंबईची तुलना POK सोबत केली होती. यानंतर, कंगनाच्या ट्विटवरून भडकलेल्या संजय राऊतांनी एका वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत कंगनाला हरामखोर मुलगी, असे म्हटले होते. या वक्तव्यावर चहू बाजूंनी राऊतांवर टिका झाल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना हरामखोरचा अर्थ नॉटी, असा सांगितला होता. 

डलहौसीमध्ये सुरू आहे 'भूत पुलिस'ची शूटिंग -सध्या पवन कृपलानी दिग्दर्शित हॉरर कॉमेडी फिल्म 'भूत पुलिस'ची शूटिंग हिमाचल प्रदेशातील डलहौसी येथे सुरू आहे. यासाठी ते अॅक्टर्स सैफ अली खान, अर्जुन कपूर, जॅकलीन फर्नांडीस, यामी गौतम आणि प्रोड्यूसर्स रमेश तौरानी आणि अक्षय राय यांच्यासोबत हिमाचल प्रदेशात आहेत. 

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतSanjay Rautसंजय राऊतShiv Senaशिवसेनाbollywoodबॉलिवूड