शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

हिमाचल प्रदेशातून निवडणुकीच्या रिंगणात उतरू शकते कंगना रणौत, या खास जागेवर असेल नजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2023 10:36 IST

जर भगवान श्रीकृष्णांची कृपा राहिली, तर आपण पुढची लोकसभा निवडणूक लढू, असे कंगनाने म्हटले होते.

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतने लोकसभा निवडणूक लढविण्यासंदर्भात भाष्य केल्यानंतर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आणले आहे. तिने शुक्रवारी गुजरातमधील द्वारका येथे राजकारणात उतरण्याचे संकेत दिले आहेत. जर भगवान श्रीकृष्णांची कृपा राहिली, तर आपण पुढची लोकसभा निवडणूक लढू, असे कंगनाने म्हटले होते. कंगना मुळची हिमाचल प्रदेशातील मंडी जिल्ह्यातील आहे. 

खरे तर, कंगना राणौत गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रातील भाजप सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक करत आहे. यामुळे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपकडून मंडी मतदारसंघातून कंगनाला उमेदवारी दिली जाऊ शकते, अशी चर्चा आहे. येथील जातीय समीकरणाचा विचार केल्यास, या मतदारसंघ्यात राजपूत आणि अनुसूचित जातीचे मतदार अधिक आहे. कंगना राणौत देखील राजपूत आहे. कंगनाचे वडिलोपार्जित घर मंडी जिल्ह्यातील भांबला येथे आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून ती सध्या कुल्लू येथील तिच्या नवीन घरी राहते. 

मंडी जिल्याचा राजकीय इतिहास असा - खरे तर, मंडी हा माजी मुख्यमंत्री वीरभद्र सिंह यांचा मतदारसंघ आहे. 1980 च्या दशकात ते राजकारणात आले. तेव्हा काँग्रेसने पंडित सुखराम यांना या जागेसाठी उमेदवारी दिली होती. हे दोघेही केंद्रात मंत्रीही झाले. कुल्लू संस्थानाचे शासक महेश्वर सिंह हेही येथून भाजपचे खासदार राहिले आहेत. दोन्ही पक्षांनी आतापर्यंत राजपूत आणि ब्राह्मण उमेदवारांनाच या जागेसाठी उमेदवारी दिली आहे. या लोकसभा मदतारसंघात एकूण 17 विधानसभा मदारसंघ येतात.

काँग्रेससोबत आहे कंगनाच्या कुटुबा संबंध -अभिनेत्री कंगनाचे कुटुंब पूर्वी काँग्रेस पक्षाशी जोडले गेले होते. कंगनाचे पणजोबा सरजू सिंह यांनी स्वातंत्र्याच्या आंदोलनात सहभाग घेतला होता. ते काँग्रेसचे सक्रीय सदस्य होते. हिमाचल प्रदेशला जेव्हा टेरिटोरियल काउंसिलचा दर्जा मिळाला होता. तेव्हा त्यांनी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती आणि 1963 ते 1967 पर्यंत ते सदस्य होते.

टॅग्स :Kangana Ranautकंगना राणौतPoliticsराजकारणBJPभाजपाlok sabhaलोकसभा