शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

कामठी.... खतांचा काळाबाजार

By admin | Updated: February 15, 2015 22:36 IST

रासायनिक खतांचा काळाबाजार

रासायनिक खतांचा काळाबाजार
महालगाव परिसरातील शेतकरी त्रस्त : पालकमंत्री व पोलीस अधीक्षकांकडे तक्रार
कामठी : तालुक्यातील नागपूर-भंडारा मार्गावरील महालगाव येथील कृषी सेवा केंद्र दुकानदारांकडून रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार सुरू असल्याची शेतकऱ्यांनी ओरड आहे. यामुळे महालगाव व परिसरातील शेतकरी त्रस्त असून याबाबत त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे.
महालगाव येथील एका कृषी सेवा केंद्रातून विविध प्रकारची रासायनिक खते व कीटकनाशक औषधांची मोठ्या प्रमाणात विक्री केली जाते. अश्विन इटनकर (रा. महालगाव, ता. कामठी) या शेतकऱ्याने १५ जानेवारीला युरिया रासायनिक खताची एक बॅग सदर कृषी सेवा केंद्र दुकानातून खरेदी केली. यात शेतकऱ्याने युरियाच्या एका बॅगेसाठी ३२० रुपये दुकानदारास दिले. परंतु सदर कृषी सेवा केंद्र मालकाने शेतकऱ्यास २९८ रुपयांची पावती दिली. शिवाय, दुकानदाराने शेतकऱ्यास पक्के बिल न देता डिलवरी मेमोची साधी पावती दिली.
येथील कृषी सेवा केंद्र दुकानदार शेतकऱ्यांना पक्के बिल न देता नेहमी रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात काळाबाजार करीत असल्याचा आरोप सदर शेतकऱ्यांनी केला आहे. रासायनिक खते व कीटकनाशकांची खरेदी केल्यानंतर एकाही शेतकऱ्यास मुख्य बिलाची प्रत न देता डिलवरी मेमोची पावती दिली जात असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
दुकानावरील फलकांवर खतांच्या किमंतीचे दर, उपलब्ध साठा लावला जात नाही. कृषी सेवा केंद्रधारक अनेक दिवसांपासून रासायनिक खतांचा काळाबाजार करून शेतकऱ्यांची लुबाडणूक करीत असल्याचे शेतकऱ्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.
याबाबत शेतकऱ्यांनी २७ जानेवारी रोजी तालुका कृषी अधिकारी व मौदा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. मात्र संबंधित अधिकाऱ्यांनी तक्रारीची दखल घेतली नाही. त्यामुळे महालगावचे माजी सरपंच प्रकाश इटनकर यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे तक्रार केली आहे. खतांच्या काळाबाजार करणाऱ्या कृषी सेवा केंद्र दुकानदारांवर प्रशासनाने त्वरित कारवाई करावी, अशी मागणी प्रकाश इटनकर, धनराज खांडेकर, हिरामण काटवले, कोठीराम ठाकरे, सुकराम मुळे, भोजराज मेश्राम, सुरेश शिंघाडे, अश्विन इटनकर आदींनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)