कामठी....

By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:19+5:302015-02-16T23:55:19+5:30

महाशिवरात्री उत्सवानिमित्त कामठीत आढावा बैठक

Kamathi .... | कामठी....

कामठी....

ाशिवरात्री उत्सवानिमित्त कामठीत आढावा बैठक
कामठी : जुनी कामठी कन्हान नदीच्या तीरावरील प्राचीन कामठेश्वर मंदिरात होणाऱ्या महाशिवरात्री उत्सवानिमित्त आढावा बैठक पार पडली. यात्रेदरम्यान भाविकांना योग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
जुनी कामठी येथील कामठेश्वर मंदिरात महाशिवरात्रीच्या पर्वावर मंगळवारी सकाळी ७ वाजेपासून प्राचीन ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी भाविक गर्दी करणार आहेत. यात्रेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये, भाविकांना योग्य सुविधा मिळाव्यात, यासाठी पालकमंत्री बावनकुळे यांनी आढावा घेतला. बैठकीला ब्रिगेडियर ए. के. सिंग, छावणी बोर्डाचे मुख्याधिकारी कपिल गोयल, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंग, उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश कंतेवार, ठाणेदार सतीश गोवेकर, अजयकुमार मालवीय, कन्हानचे ठाणेदार सुभाष माकोडे, वीज वितरण कंपनीचे अभियंता मालविये, तहसीलदार डी. एस. भोयर, नगर परिषदेचे मुख्याधिकारी विपीन मुद्दा, बाबूलाल हिरणवार, महादेव मामीलवार, श्रीराम कुशवाह, प्रकाश सिरिया, भूषण इंगोले आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Kamathi ....

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.