कामराभाट स्फोटाचे दहशतवाद्यांशी कनेक्शन?

By Admin | Updated: May 11, 2014 00:04 IST2014-05-11T00:04:18+5:302014-05-11T00:04:18+5:30

पोलीस तपास गांभीर्याने : बॉम्ब निर्मितीचे साहित्य पुरविणार्‍यांचा कसून शोध

Kamarabhatta explosion connection with terrorists? | कामराभाट स्फोटाचे दहशतवाद्यांशी कनेक्शन?

कामराभाट स्फोटाचे दहशतवाद्यांशी कनेक्शन?

लीस तपास गांभीर्याने : बॉम्ब निर्मितीचे साहित्य पुरविणार्‍यांचा कसून शोध
मडगाव : मयत पपलू मुलगुंड याला बॉम्ब तयार करण्यासाठी साहित्य कोण पुरवित होते याचा शोध घेण्यास आता पोलिसांनी सुरुवात केली आहे. आंतकवादी कारवायाशी या स्फोट प्रकरणाचा कुठलाही संबध नसला तरी जेथून पपलू बॉम्ब बनविण्यासाठी लागणारे वस्तु आणत होता त्या गँगचा आंतकवादी संघटनेकडे संबध नाकारता येत नसल्याने पोलिस कोणताही धोका पत्करण्यास तयार नसून त्यांनी या प्रकरणाचा तपास गांभीर्याने घेतला आहे.घटनास्थळी पोलिसांना मोबाईल सापडला आहे. त्या आधारे पपलूशी संपर्कात असणार्‍या व्यक्तींचा पोलिस सद्या माग काढत आहेत. दरम्यान, मयताच्या घरातून जप्त केलेले गावठी बॉम्ब निकामी करुन मागाहून ते सारझोरा येथील दगडी खाणीत नष्ट करण्यात आले तर जप्त केलेली भुकटी पुढील चाचणीसाठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवून देणार असल्याची माहिती मायणा - कुडतरी पोलिसांकडून मिळाली आहे.गुरुवारी कामराभाट - सां जुझे दि अरियाल येथे एका घरात स्फोट होउन त्यात पपलू हा जागीच ठार झाला होता तर अन्य पाच जण जखमी झाले होते. जखमीपैकी सामीन हिला आता उपचारासाठी गोमेकॉत दाखल केले आहे तर नूरजहा, साहिल व उमेश गायकवाड यांच्यावर मडगावच्या हॉस्पिसियोत उपचार चालू आहे. गायत्री या अन्य जखमी महिलेवरही गोमेकॉत उपचार चालू आहे.मयत पपलु याच्या मृतदेहावर शवचिकित्सा केल्यानंतर मृतदेह कुटुंबियांच्या ताब्यात देण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. मयताच्या घरात सुमारे ५0 च्यावर गावठी बॉम्ब सापडले होते. एनएसजी कमांडोने शुक्रवारी हे बॉम्ब आपल्या ताब्यात घेउन मागाहून निकामी केले. पपलु हा गेली अनेक वर्षे गोव्यात रहात होता. घरातच बॉम्ब तयार करुन मागाहून तो रानटी प्राण्यांच्या शिकारीसाठी त्याचा वापर करत होता. रानटी प्राण्यांचे मास तो विकत असे, त्याचप्रमाणे मासेमारीसाठीही या बॉम्बचा वापर केला जात होता अशी माहिती मिळाली आहे. खारेबांद, घाउक मासळी मार्केट तसेच एसजीपीडए मार्केट परिसरात त्याचा वावर होता. या भागातील काही लोकांचीही पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे.पपलू हा मूळ हुबळी येथील असून तो हरिण्यशिकारी या जमातीचा आहे. या जमातीतील लोक रानटी प्राण्यांची शिकार करतात. पपलूचा कित्येक वर्षापासून गोव्यात वावर असला तरी काही दिवसांपुर्वी तो आपल्या मूळ गावी हुबळी येथे निवडणुक मतदानासाठी गेला होता. या पार्श्वभूमीवर हुबळी भागातील लोकांकडेही त्याचा संबध असावा या निष्कर्षापर्यंतही पोलीस येउन पोहचले आहेत. पोलिसांनी फोंडा तसेच मडगाव व लगतच्या परिसरातील काही व्यक्तींना पोलीस स्थानकात बोलावून पपलूच्या व्यवहाराविषयी अधिक माहिती गोळा करण्यास सुरुवात केली आहे. ज्वालग्राही पर्दाथ कायदयांतर्गंत मयतावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली मायणा - कुडतरीचे पोलीस निरीक्षक गुरुदास कदम पुढील तपास करत आहेत.(प्रतिनिधी)

Web Title: Kamarabhatta explosion connection with terrorists?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.