शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अब की बार सुपरफास्ट कारभार; अवघ्या 24 तासांत काँग्रेस सरकारांचे 10 मोठे निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2018 10:16 IST

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह मोठ्या निर्णयांचा धडाका

नवी दिल्ली: हिंदी पट्ट्यातील तीन राज्यांमध्ये सत्ता स्थापन करताच काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी सुपरफास्ट कारभार सुरू केला आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांनी निर्णयांचा धडाका लावला आहे. मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री कमलनाथ आणि छत्तीसगडचेमुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताच अवघ्या काही तासांमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. या दोन्ही मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना कर्जमाफी जाहीर केली आहे. सत्तेत आल्यास 10 दिवसांमध्ये कर्जमाफी देऊ, असं आश्वासन काँग्रेसनं दिलं होतं. या आश्वासनाची पूर्तता मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये केली. काँग्रेस मुख्यमंत्र्यांनी गेल्या 24 तासांत घेतलेले महत्त्वाचे निर्णय-1. मध्य प्रदेश- शेतकऱ्यांचं 2 लाखांपर्यंतचं कर्ज माफ; या निर्णयाचा फायदा 30 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे. 2. मध्य प्रदेश- कन्यादान योजनेच्या निधीत भरघोस वाढ; 28 हजाराहून निधी थेट 51 हजारांवर3. मध्य प्रदेश- स्थानिकांना रोजगाराच्या अधिक संधी; नवा उद्योगांमध्ये स्थानिकांना 70 टक्के रोजगार देणं अनिवार्य, अन्यथा अनुदान मिळणार नाही4. छत्तीसगड- 16 लाख 65 हजार शेतकऱ्यांचं 6100 कोटी रुपयांचं कर्ज माफ5. छत्तीसगड- तांदळाला मिळणारा हमीभाव प्रति क्विंटल 2500 रुपयांवर6. छत्तीसगड- झीरम हल्ल्यातील शहिदांना न्याय मिळवून देण्यासाठी एसआयटीची स्थापना7. छत्तीसगड- नक्षलविरोधी अभियानाचे विशेष संचालक डी. एम. अवस्थी यांच्यावर असणारी जबाबदारी वाढवली; त्यांना मुकेश गुप्ता यांच्या जागी एसीबी आणि ईओडब्ल्यूची जबाबदारी देण्यात आली.  8. छत्तीसगड- अशोक जुनेजा यांची गुप्तचर विभागाच्या प्रमुखपदी निवड9. छत्तीसगड- संजय पिल्लई यांची गुप्तचर विभागाच्या विशेष संचालकपदी नियुक्ती; पिल्लई 1968 च्या बॅचचे अधिकारी10. छत्तीसगड- झीरम खोऱ्यातील दुर्घटनेवेळी गुप्तचर विभागाचे महानिरीक्षक असलेल्या मुकेश गुप्ता यांची बदली; गुप्ता यांची रायपूरमधील पोलीस मुख्यालयात बदली

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशChhattisgarhछत्तीसगडFarmerशेतकरीChief Ministerमुख्यमंत्री