बँक घोटाळ्याप्रकरणी कमलनाथ यांच्या भाच्याला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 20, 2019 09:27 AM2019-08-20T09:27:01+5:302019-08-20T09:27:38+5:30

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे आणि मोजरबेअरचे माजी कार्यकारी संचालक रतुल पुरी यांना बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे.

Kamal Nath's nephew arrested for bank scam | बँक घोटाळ्याप्रकरणी कमलनाथ यांच्या भाच्याला अटक 

बँक घोटाळ्याप्रकरणी कमलनाथ यांच्या भाच्याला अटक 

Next

नवी दिल्ली/भोपाळ - मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे भाचे आणि मोजरबेअरचे माजी कार्यकारी संचालक रतुल पुरी यांना बँक घोटाळ्याप्रकरणी ईडीने अटक केली आहे. रतुल पुरी यांच्यावर सुमारे 300 कोटी रुपयांहून अधिकचा घोटाळा केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.  
या प्रकरणी दोन दिवसांपूर्वी सीबीआयने रतुल पुरी आणि अन्य काही जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता. हा गुन्हा सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्यावतीने दाखल 354 कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी दाखल करण्यात आला होता. सदर कंपनी 2009 पासून विविध बँकांकडून कर्ज घेत होती. तसेच कंपनीकडून अनेकदा कर्जाच्या पुनर्गठणाच्या अटींमध्ये बदल केला गेला होता. दरम्यान, बँकेची ही तक्रार आता सीबीआयकडून दाखल गुन्ह्याचा भाग बनली आहे. 

 सीबीआयने रतुल पुरी यांच्यासोबतच एमबीआयएल कंपनी, त्यांचे वडील दीपक पुरी, आई नीता पुरी तसेच संजय जैन आणि विनीत शर्मा यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला होता. या सर्वांवर कथितपणे गुन्हेगारी षडयंत्र रचणे, फसवणूक, घोटाळा आणि भ्रष्टाचाराचे आरोप ठेवण्यात आले आहेत, असा अधिकाऱ्यांनी सांगितले.  

याप्रकरणी बँकेने सांगितले की, रतुल यांनी 2012 मध्ये कंपनीचे कार्यकारी संचालकपद सोडले होते. मात्र त्यांचे आई-वडील संचालक मंडळात होते. दरम्यान, सीबीआयने याप्रकरणी सोमवारी सहा ठिकाणी धाड टाकली होती. 

दरम्यान, अगुस्ता वेस्टलँड घोटाळ्याप्रकरणी रतुल पुरी यांची चौकशी सुरू आहे. मात्र बँक घोटाळाप्रकरणात आता पुरी यांना ईडीने अटक केली आहे. रतुल पुरी यांच्यावरील कारवाई हा कमलनाथ यांच्या कुटुंबीयांसाठी धक्का मानला जात आहे. 

Web Title: Kamal Nath's nephew arrested for bank scam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.