शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

Video: छत्रपती शिवरायांचा पुतळा बुलडोझरने हटवला; भाजपाचा काँग्रेस शिवसेनेवर हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2020 19:40 IST

शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला सहन होईल का?

मुंबई - मध्य प्रदेशातील छिंदवाडा परिसरात लावण्यात आलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती काँग्रेस सरकारने काढल्यामुळे अनेक शिवप्रेमी कार्यकर्ते नाराज झाले आहेत. काही हिंदुत्ववादी संघटनांनी या प्रकरणी छिंदवाडा-नागपूर हायवे रास्ता रोको आंदोलन केले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. शिवरायांचा अपमान केल्यामुळे परिसरातील दुकाने बंद करण्यात आली होती. 

या आंदोलनकर्त्यांनी आरोप केला आहे की, मध्य प्रदेश सरकारने जाणूनबुजून शिवाजी महाराजांची मूर्ती हटवली. मात्र मूर्ती स्थापन करण्याची कोणतीही परवानगी न घेतल्याने ही कारवाई केल्याचे स्थानिक अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. याबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओमुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. यामध्ये काही अधिकारी पोलीस प्रशासनाच्या मदतीने बुलडोझरच्या सहाय्याने शिवाजी महाराजांची मूर्ती असलेला चौथरा तोडताना दिसत आहे.

मात्र या कारवाईमुळे भाजपाने शिवसेना आणि काँग्रेसवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे राष्ट्राचे गौरव आणि आराध्य दैवत आहेत. त्यांचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही. जर कोणालाही आक्षेप असता तर सन्मानपूर्वक मार्गाने हा चौथरा हटवू शकत होते मात्र मध्य प्रदेश सरकारला महापुरुषांचा अपमान करणे गर्वाचे वाटते असा आरोप माजी मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी केला आहे.

त्याचसोबत शिवाजी महाराजांचा अपमान महाराष्ट्रात सत्तेत असणाऱ्या शिवसेनेला सहन होईल का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. तर महाराष्ट्र भाजपानेही याबाबत व्हिडीओ पोस्ट करुन शिवसेना-काँग्रेसवर निशाणा साधला आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा मध्यप्रदेश मधील पुतळा पाडण्याचा प्रयत्न करून काँग्रेसने महाराजांबद्दल आपले 'प्रेम' दाखवलेलेच आहे. आता वेळ आहे शिवसेनेची!! त्यांना महाराज जवळचे वाटतात की सत्तेतला मित्र काँग्रेस? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. 

छिंदवाडा येथील मोहगावच्या चौकात शासकीय जमिनीवर ही मूर्ती लावण्यात आली होती. मात्र प्रशासनाची परवानगी घेतली नव्हती म्हणून प्रशासनाने २४ तासात ही मूर्ती हटवून कारवाई केली. ही बातमी परिसरात पसरल्यामुळे नाराज झालेल्या शिवप्रेमींनी विरोध प्रदर्शन करत रास्ता रोको केला. मात्र १९ फेब्रुवारीला शिवजयंतीच्या दिवशी शिवाजी महाराजांची प्रतिमा स्थापन करण्यात येईल असं आश्वासन दिल्याने हे आंदोलन थांबले. 

टॅग्स :Shivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराजMadhya Pradeshमध्य प्रदेशcongressकाँग्रेसBJPभाजपाShiv Senaशिवसेना