हिंदू मुलीशी विवाह करणाऱ्या मुस्लिम युवकास केली मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2018 00:00 IST2018-07-24T23:59:42+5:302018-07-25T00:00:12+5:30
हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

हिंदू मुलीशी विवाह करणाऱ्या मुस्लिम युवकास केली मारहाण
गाझियाबाद : एका हिंदू मुलीशी नोंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी गाझियाबाद न्यायालयात आलेल्या एका मुस्लिम युवकास हिंदुत्ववादी संघटनांच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी मारहाण केली.
नॉयडा येथील एका फर्ममध्ये नोकरी करणारे साहिल आणि प्रीती सिंग विवाह नोंदणीच्या पद्धतीविषयी त्याच्या वकिलाच्या चेंबरमध्ये बसून बोलणी करीत असताना अचानक जमावाने आत घुसून साहिल यास मारहाण सुरु केली. साहिल मुळचा भोपाळचा तर प्रीती सिंग उत्तर प्रदेशमधील बिजनौरची आहे. दोघांच्या प्रेमविवाहास घरच्यांनी विरोध केल्याने ते नोंंदणी पद्धतीने विवाह करण्यासाठी आले होते.