महिला काँग्रेसमध्ये कलगीतुरा

By Admin | Updated: February 16, 2015 23:55 IST2015-02-16T23:55:19+5:302015-02-16T23:55:19+5:30

पुणे : काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांना पदावरून हटविण्याची मागणी एक गट करीत असताना विद्यमान महिला शहराध्यक्ष सोनाली मारणे यांनी त्यांचे समर्थन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महिला काँग्रेसमधील दोन गटांत आरोपप्रत्यारोपाचा कलगिरीतुरा सुरू आहे.

Kalgitra in the women's Congress | महिला काँग्रेसमध्ये कलगीतुरा

महिला काँग्रेसमध्ये कलगीतुरा

णे : काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा कमल व्यवहारे यांना पदावरून हटविण्याची मागणी एक गट करीत असताना विद्यमान महिला शहराध्यक्ष सोनाली मारणे यांनी त्यांचे समर्थन केले आहे. गेल्या काही दिवसांपासून महिला काँग्रेसमधील दोन गटांत आरोपप्रत्यारोपाचा कलगिरीतुरा सुरू आहे.
कमल व्यवहारे यांनी महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी सोनाली मारणे यांची नियुक्ती केली. त्यावेळी माजी महिला शहराध्यक्ष निता रजपूत व माजी शिक्षण मंडळ अध्यक्ष संगिता तिवारी यांनी त्यावर आक्षेप घेतला होता. काँग्रेसमध्ये सक्रीय व एकनिष्ठ महिला कार्यकर्त्या असताना व्यवहारे यांनी त्यांना डावलून केवळ निकटवर्तीय आहे म्हणून ही नियुक्ती केली आहे. पक्षश्रेष्ठींनी व्यवहारे यांना आतापर्यंत महापौर, बाजार समिती, नियोजन मंडळ व स्थायी समितीची संधी मिळाली आहे. तरीही पक्ष वाढीसाठी त्यांनी कोणतेही प्रयत्न केलेले नाहीत. एका ब्लॉकमध्ये महिला काँग्रेसचे काम दिसत नाही. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदावरून त्यांना हटविण्याची मागणी रजपूत व तिवारी यंानी केली आहे.
दरम्यान, कमल व्यवहारे यांनी पक्षवाढीसाठी राबविलेल्या विविध उपक्रमांची माहिती सोनाली मारणे यांनी पत्रकार परिषदेत सोमवारी दिली. काँग्रेसच्या सर्वच महिला पदाधिकारी व कार्यकर्तींनी एकमेकांवर वैयक्तिक टीका करण्यापेक्षा एकत्र येवून चर्चा करायला पाहिजे. सद्यस्थितीमध्ये जातीयवादी राजकीय पक्षाचा सामना करण्यासाठी सर्वांनी अंतर्गत वादविवाद बाजुला ठेवून पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी काम केले पाहिजे, असे आवाहन मारणे यांनी केले.

Web Title: Kalgitra in the women's Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.