दिल्लीतील औरंगजेब रोडला कलामांचे नाव

By Admin | Updated: August 28, 2015 20:09 IST2015-08-28T20:09:52+5:302015-08-28T20:09:52+5:30

दिल्लीतील औरंगजेब रोडचे नामकरण माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम मार्ग असे करण्यात आले आहे. नवी दिल्ली महापालिकेने शुक्रवारी हा कौतुकास्पद निर्णय आहे.

Kalam's name in Aurangzeb Road in Delhi | दिल्लीतील औरंगजेब रोडला कलामांचे नाव

दिल्लीतील औरंगजेब रोडला कलामांचे नाव

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २८ - दिल्लीतील औरंगजेब रोडचे नामकरण माजी राष्ट्रपती एपीजे अब्दुल कलाम मार्ग असे करण्यात आले आहे. नवी दिल्ली महापालिकेने शुक्रवारी हा कौतुकास्पद निर्णय घेतला असून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली महापालिकेचे आभार मानले आहे. 

माजी राष्ट्रपती व मिसाईल मॅन म्हणून जाणारे एपीजे अब्दुल कलाम यांचे २७ जुलै रोजी निधन झाले. कलाम यांच्या निधनानंतर दिल्लीतील औरंगजेब रोडला एपीजे अब्दुल कलाम यांचे नाव द्यावे अशी मागणी दिल्लीतील भाजपा खासदार महेश गिरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली होती. या मागणीनंतर नवी दिल्ली महापालिकेन औरंगजेब रोडला अब्दुल कलाम यांचे नाव दिले आहे. औरंगजेब रोडचे नाव बदलण्याची मागणी यापूर्वीही करण्यात आली होती. औरंगजेब हा क्रूर राजा असल्याने त्याचे नाव रस्त्याला देऊ नये अशी मागणी कट्टर हिंदूत्ववादी संघटनांनी केली होती. 

Web Title: Kalam's name in Aurangzeb Road in Delhi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.