विदूषी मीरा कोसंबी कालवश

By admin | Published: February 27, 2015 01:59 AM2015-02-27T01:59:42+5:302015-02-27T01:59:42+5:30

सुविख्यात समाजशास्त्रज्ञ आणि स्व. डी. डी. कोसंबी यांच्या कन्या मीरा कोसंबी (७६) यांचे पुणे येथे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले.

Kadishashi Meera Kosambi Kalvash | विदूषी मीरा कोसंबी कालवश

विदूषी मीरा कोसंबी कालवश

Next

पणजी : सुविख्यात समाजशास्त्रज्ञ आणि स्व. डी. डी. कोसंबी यांच्या कन्या मीरा कोसंबी (७६) यांचे पुणे येथे गुरुवारी अल्पशा आजाराने निधन झाले.
बौद्ध धर्माचे गाढे अभ्यासक असलेले आजोबा आ. धर्मानंद कोसंबी, तसेच इतिहासतज्ज्ञ वडील डी. डी. कोसंबी यांच्या पावलावर पाऊल ठेवत मीरा यांनी नागरी समाजशास्त्र व महिलाविषयक संशोधनात मोलाची भर घातली आहे. मुंबईतील श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठातील रिसर्च सेंटर फॉर वुमेन्स स्टडीजच्या संचालक पदावरून निवृत्त झाल्यावर त्यांनी मराठी आणि इंग्रजीतून अनेक संशोधनात्मक पुस्तके लिहिली. तसेच त्यांनी पंडिता रमाबाई यांचे चरित्र आणि यांच्या मराठी लेखनाचे इंग्रजीत केलेले भाषांतर, संकलन, संपादन चोखंदळ वाचकांकडून फारच वाखाणले गेले.

Web Title: Kadishashi Meera Kosambi Kalvash

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.