शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2025 23:21 IST

Kabaddi Player Rana Balachauria shot dead: बंबीहा टोळीने घेतली हत्येची जबाबदारी, गोळीबारानंतर हल्लेखोर पसार

Kabaddi Player Rana Balachauria shot dead: पंजाबमधील मोहाली येथील सोहाना परिसरात सोमवारी रात्री एका खाजगी कबड्डी स्पर्धेदरम्यान मोटारसायकलवरून आलेल्या दोन ते तीन अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. कबड्डीपटू आणि प्रमोटर राणा बालचौरिया याच्या चेहऱ्यावर आणि शरीराच्या वरच्या भागात चार ते पाच गोळ्या लागल्या. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, पण अखेर त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले. मोहालीचे पोलिस अधीक्षक हरमनदीप हंस यांच्या म्हणण्यानुसार, हल्लेखोर सेल्फी काढण्याच्या बहाण्याने त्याच्याकडे गेले. राणा बालचौरिया थांबताच हल्लेखोरांनी अचानक गोळीबार केला. ही घटना सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी केली असल्याची चर्चा रंगली आहे. (Sidhu Moose Wala revenge)

बंबीहा टोळीचा हात असल्याचा संशय

राणा बालचौरियाला तातडीने मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात नेण्यात आले, जिथे त्याची प्रकृती चिंताजनक होती. उपचारादरम्यान मात्र त्याचा काही वेळातच मृत्यू झाला. पोलिस तपासात असे दिसून आले आहे की अगदी जवळून गोळीबार करण्यात आल्याने जीव वाचण्याची शक्यता खूप कमी होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, घटनेनंतर हल्लेखोर मोटारसायकलवरून पळून गेले. पोलिसांनी परिसरात सुरक्षा वाढवली आहे आणि सीसीटीव्ही फुटेज आणि सोशल मीडिया अँक्टिव्हिटी तपासत आहेत. या हत्येमागे बंबीहा टोळीचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे, पण पोलिसांनी याला अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाही.

या घटनेचा प्रसिद्ध पंजाबी गायकाशी काही संबंध आहे का, याचाही पोलिस तपास करत आहेत. कारण एक पंजाबी गायक गोळीबाराच्या काही काळापूर्वी कबड्डीस्थळी उपस्थित राहणार होता. यादरम्यान, बंबीहा टोळीशी संबंधित एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे, ज्यामध्ये सोहानामध्ये राणा बालाचौरियाच्या हत्येची जबाबदारी घेण्यात आली आहे. ही घटना सिद्धू मूसेवालाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी केली असल्याची चर्चा रंगली आहे.

पंजाबी भाषेत लिहिलेल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये असे लिहिले आहे की...

सर्वांना सत् श्री अकाल, राणा बालाचौरियाची आज मोहाली सोहाना साहिब कबड्डी कपमध्ये हत्या करण्यात आली. मी, डोनी बाल शगनप्रीत, मोहब्बत रंधावा, अमर खेवा प्रभदासवाल आणि कौशल चौधरी या हत्येची जबाबदारी स्वीकारतो. या माणसाने जग्गु खोती आणि लॉरेन्स बिश्नोईसोबत राहून आमच्याविरुद्ध काम केले. त्याने सिद्धू मूसेवालाच्या मारेकऱ्याला आश्रय दिला आणि त्या माणसांची वैयक्तिक काळजी घेतली. आज, आम्ही राणाला मारून आमचा भाऊ मूसेवालाचा बदला घेतला. हे कृत्य आमच्या माखन अमृतसर आणि डिफॉल्टर करणने केले आहे. आजपासून, मी सर्व खेळाडूंना आणि त्यांच्या पालकांना विनंती करतो की कोणीही जग्गू खोती आणि हॅरी टॉटच्या संघात खेळू नये नाहीतर त्यांनाही हेच परिणाम भोगावे लागतील. आम्हाला कबड्डीची कोणतीही ऍलर्जी नाही. आम्हाला खोती आणि हॅरी टॉटच्या कबड्डीमध्ये कोणताही हस्तक्षेप नको आहे.

लोकांना घाबरवण्यासाठी हवेत गोळीबार

प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे की, सुरुवातीला लोकांना वाटले की फटाके फोडले जात आहेत. हल्लेखोरांनी प्रेक्षकांमध्ये दहशत पसरवण्यासाठी हवेत गोळीबारही केला. स्पर्धेच्या संध्याकाळच्या सामन्यांदरम्यान बक्षीस वितरण समारंभाला एक प्रसिद्ध पंजाबी गायक उपस्थित राहणार असल्याचे वृत्त आहे, त्यामुळे स्टेडियममध्ये मोठी गर्दी जमली होती. पोलिस सध्या संपूर्ण घटनेचा तपास करत आहेत.

English
हिंदी सारांश
Web Title : Kabaddi player Rana Balachauria shot dead; Sidhu Moose Wala revenge suspected.

Web Summary : Kabaddi player Rana Balachauria was fatally shot in Mohali during a tournament. Attackers, suspected to be from the Bambiha gang, may have targeted him for allegedly aiding Sidhu Moose Wala's killers. A social media post claimed responsibility, citing revenge.
टॅग्स :Sidhu Moosewalaसिद्धू मूसेवालाPunjabपंजाबKabaddiकबड्डी