शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
3
दिल्ली-मुंबई महामार्गावर थरकाप उडवणारा अपघात; स्वच्छता कर्मचाऱ्यांना चिरडले, ६ ठार, ५ गंभीर जखमी
4
“...तर भेटी घेण्यात काही गैर नाही”; शिंदेसेनेत प्रवेशाच्या चर्चा, चंद्रहार पाटील थेट बोलले
5
आयपीएलचा अर्धा हंगाम संपला, प्लेऑफसह ऑरेंज आणि पर्पल कॅपची शर्यतही झाली रंगतादार, कोण आघाडीवर? वाचा  
6
Gensol विरोधात इरेडानं दाखल केली तक्रार; दोन्ही कंपन्यांच्या शेअर्समध्ये भूकंप, तुमच्याकडे आहे का?
7
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
8
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
9
ती माझी मैत्रीण! दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीबाबत एल्विश यादवचा खुलासा, म्हणाला- "तो फोटो पाहिल्यानंतर..."
10
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
11
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
12
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
13
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
14
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
15
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
16
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
17
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थयथयाट
18
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
19
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
20
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!

भाजपाकडून EVM मध्ये छेडछाड होण्याची ज्योतिरादित्य शिंदेंना शंका 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2018 16:54 IST

मध्य प्रदेशात मतदान झाल्यानंतर जनमताच्या कौल बदलवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून इव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते

भोपाळ - सत्ताधारी भाजपा आणि काँग्रेसमध्ये झालेल्या अटीतटीच्या प्रचारानंतर मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी 28 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. मात्र मतदान झाल्यानंतर जनमताच्या कौल बदलवण्यासाठी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाकडून इव्हीएममध्ये छेडछाड होऊ शकते, अशी भीती राज्यातील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांना वाटत आहे. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी इव्हीएम ठेवण्यात आलेल्या स्ट्राँग रूमवर कडेकोट पहारा द्यावा, अशी सूचना त्यांनी केली आहे. मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीची मतमोजणी 11 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यादरम्यान सर्व इव्हीएम कडेकोट पहाऱ्यात स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. मात्र या कडक सुरक्षेत ठेवण्यात आलेल्या या इव्हीएममध्ये छेडछाड करण्याचा प्रयत्न भाजपाकडून होत असल्याचा आरोप ज्योतिरादित्य शिंदे यांनी केला आहे. "भोपाळमध्ये स्ट्राँग रूमच्या बाहेर लावलेली एलइडी बंद होणे, सागर जिल्ह्यात गृहमंत्र्यांच्या विधानसभा मतदारसंघात राखीव इव्हीएम मशीन 48 तास उशिराने पोहोचणे, सटणा-खरगोन येथे अज्ञात बॉक्समधून इव्हीएम स्ट्राँग रूममध्ये नेण्यात येत असल्याचा व्हिडीओ कुठे ना कुठे मोठे छडयंत्र रचले जात असल्याकडे इशारा करत आहेत,'' असा आरोप शिंदे यांनी ट्विटरवरून केला. 

  ''भाजपाला आपला संभाव्य पराभव दिसू लागला आहे. त्यामुळे लोकशाही आणि जनमत  यांना पायदळी तुडवण्यासाठी भाजपाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. हा सरकारी संरक्षणाखाली लोकशाहीची हत्या करण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने लवकरात लवकर कठोर पावले उचलून दोषींवर कारवाई करून इव्हीएमच्या सुरक्षेची खबरदारी घ्यावी, असेही शिंदे यांनी म्हटले आहे.  

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018ElectionनिवडणूकBJPभाजपाcongressकाँग्रेस