मागील काही महिन्यांपूर्वी युट्यूबर ज्योती मल्होत्रा हिने पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होता. या प्रकरणी तिला पोलिसांनी ताब्यात घेतले. दरम्यान, आता तिच्याविरुद्ध ठोस पुरावे सापडले आहेत. ज्योती मल्होत्रावरपाकिस्तानविरुद्ध हेरगिरी केल्याचा आरोप आहे. तीन महिन्यांच्या चौकशीनंतर २५०० पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
ज्योती मल्होत्रा उर्फ ज्योती राणी हिचे 'ट्रॅव्हल विथ जो' नावाचे युट्यूब चॅनल होते. तिला मे महिन्यात हरियाणातील हिसार येथून अटक करण्यात आली होती. ती पाकिस्तानी उच्चायुक्तालयात एहसान उर रहीम उर्फ दानिश याच्या संपर्कात होती असा पोलिसांचा आरोप आहे.
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
पोलिसांनी आरोपपत्रात म्हटले आहे की, ज्योती मल्होत्रा बराच काळ हेरगिरी करत होती. रहीम व्यतिरिक्त, मल्होत्रा आयएसआय एजंट शाकीर, हसन अली आणि नासिर ढिल्लन यांच्या संपर्कात होता. पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूर नंतर, रहीमला २४ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले होते. त्याच्यावर भारतीय सैन्याच्या कारवायांशी संबंधित संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवल्याचा आरोप होता.
पाकिस्तान आणि चीन दौरा
ज्योती मल्होत्रा गेल्या वर्षी १७ एप्रिल रोजी पाकिस्तानला गेली होती. ती १५ मे रोजी भारतात परतली. त्यानंतर फक्त २५ दिवसांनी, १० जून रोजी ज्योती चीनला गेली आणि जुलैपर्यंत तिथेच राहिली. त्यानंतर ती नेपाळलाही गेली, असा आरोप आहे. ज्यावेळी ज्योती करतारपूर कॉरिडॉरमार्गे पाकिस्तानला गेली तेव्हा तिने पाकिस्तानी पंजाबच्या मुख्यमंत्री आणि माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्या कन्या मरियम नवाज यांची मुलाखत घेतली. पहलगाम दहशतवादी हल्ल्यादरम्यान आणि भारत आणि पाकिस्तानमधील चार दिवसांच्या संघर्षादरम्यान ज्योती पाकिस्तानी अधिकाऱ्यांच्या संपर्कात होती, असा आरोप आहे.