शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
ज्या देशाच्या कारमधून पुतिन यांनी केला प्रवास; आता त्यांच्याचविरोधात उतरवले लढाऊ जहाज, तणाव वाढला
3
रोहित शर्मा नवा 'सिक्सर किंग'! पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी म्हणतो, "जो विक्रम झालाय तो..."
4
जुने बँक खाते बंद करताय? थांबा! 'या' ५ चुका केल्यास तुमच्या खिशातून कापले जातील एक्स्ट्रा चार्ज
5
“८ दिवसांत ई-वाहनांना टोलमाफीची अंमलबजावणी करा”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे निर्देश
6
अविवाहित मुलीच्या संपत्तीचा खरा वारसदार कोण? कायद्यानुसार कोणाचे असतात प्रथम अधिकार?
7
पोलिसांनी लाईनमनला केली अटक, संतापलेल्या वीज कर्मचाऱ्यांनी असा घेतला बदला, अखेरीस...
8
संतापजनक! "आधी ४ लाख भरा, मग मृतदेह न्या"; बिल पाहून नातेवाईकांचा रुग्णालयावर गंभीर आरोप
9
'या' कर्जमुक्त कंपनीच्या शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या; ₹६० पेक्षा कमी आहे किंमत, दमानींचीही गुंतवणूक
10
Travel : भारतातून १००००० रुपये घेऊन थायलंड ट्रिपला निघताय? राहणं, खाणं आणि फिरणं एकूण किती होईल खर्च?
11
“देशात कधीही झाले नाही, ती परंपरा PM मोदी अन् CM फडणवीसांनी सुरू केली”; कुणी केली टीका?
12
Akola Live in Partner killed: २८ वर्षाच्या प्रेयसीची पवनने हत्या केली आणि पोलीस ठाण्यात जाऊन म्हणाला, 'तिने माझ्या घरात...'
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, सरकारनं 'या' महत्त्वाच्या नियमांत केला बदल; १५ डिसेंबरपासून लागू होणार
14
संतापजनक...! गुजरातमध्ये 6 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार, नराधमानं प्रायव्हेट पार्टमध्ये...; आरोपी 3 मुलांचा बाप!
15
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
16
क्रिकेट कोचला बॅटने बेदम मारहाण; २० टाके पडले! संघात न घेतल्यानं तिघे भडकले, अन्....
17
प्रेम, धोका आणि ब्लॅकमेलिंग! व्यापाऱ्याचा महिला DSP वर कोट्यवधी रुपये हडपल्याचा गंभीर आरोप
18
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
19
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
20
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
Daily Top 2Weekly Top 5

वडील म्हणाले पैसे नाहीत, तरीही ज्योती मल्होत्राला मिळाला वकील! कोण मांडणार तिची बाजू? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 14:11 IST

ज्योती १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत असून, तिच्या वडिलांनी वकील करण्यासाठी पैसे नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता ज्योतीला तिची बाजू मांडणारे वकील सापडले आहेत. 

Jyoti Malhotra Case Update : जम्मू-काश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामुळे संपूर्ण देश हादरून गेला होता. या हल्ल्यानंतर ऑपरेशन सिंदूर करून भारताने दहशतवाद्यांना चांगलाच धडा शिकवला. मात्र, या दरम्यान भारतातून काही अशा गद्दारांना अटक करण्यात आली, ज्यांनी देशाची अतिसंवेदनशील माहिती पाकिस्तानपर्यंत पोहोचवण्याचे काम केले. यामधले सगळ्यात मोठे नाव ज्योती मल्होत्राचे आहे. ज्योती सध्या पोलिसांच्या ताब्यात असून, आता तिने मुकेश कुमार यांच्याकडे आपलं वकीलपत्र सोपवलं आहे.  युट्यूबर असणारी ज्योती मल्होत्रा ही तब्बल तीन वेळा पाकिस्तानात जाऊन आली होती. या दरम्यान तिने पाकिस्तानातील अनेक ठिकाणी व्हिडीओ देखील बनवले होते. इतकंच नाही तर ती भारतातील गुप्त माहिती पाकिस्तानला पुरवत होती. याच आरोपांखाली तिला अटक करण्यात आली आहे. ज्योती १४ दिवसांच्या पोलीस कोठडीत असून, तिच्या वडिलांनी वकील करण्यासाठी पैसे नसल्याचे म्हटले होते. मात्र, आता ज्योतीला तिची बाजू मांडणारे वकील सापडले आहेत. 

वडिलांनी घेतली ज्योतीची भेट!

नुकतीच ज्योतीच्या वडिलांनी, हरीश मल्होत्रा यांनी  हिसारच्या मध्यवर्ती तुरुंगात जाऊन मुलीची भेट घेतली होती. यानंतर आता ज्योतीच्या वकिलांचे नाव समोर आले आहे. ज्योतीचे केस आपल्या हातात घेतल्यावर वकील मुकेश कुमार म्हणाले की, "ज्योती मल्होत्राने काल मला तिचा वकील म्हणून नियुक्त केले  आहे. आज मी या प्रकरणी माझा वकिलीनामा न्यायलयात सादर केला आहे. आधी मी या प्रकरणाची संपूर्ण माहिती घेईन, मगच मी यावर काही बोलू शकेन.  

पोलिसांचा तपास सुरूसध्या पोलीस ज्योतीचे आर्थिक व्यवहार तपासत आहेत. पुढच्या सुनावणीच्या वेळी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे ज्योतीला कोर्टात हजर केले जाऊ शकते. या प्रकरणी पुरावे जमा करण्याचा प्रयत्न पोलीस करत असून, ज्योतीचे सगळे कागदपत्र तपासले जात आहेत. ज्योतीकडून पोलिसांनी तीन मोबाईल फोन, एक लॅपटॉप, आणि काही इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त केली आहेत. ज्योतीचे फोन रेकॉर्ड आणि मेसेज देखील तपासले जात आहेत.  

टॅग्स :Jyoti Malhotraज्योती मल्होत्राPakistanपाकिस्तानIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर