शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ‘आय लव्ह यू’ म्हणणे हा लैंगिक छळ नाही; छत्तीसगड उच्च न्यायालयाचा निकाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2025 06:19 IST

एखादी व्यक्ती लैंगिक उद्देश न बाळगता अल्पवयीन मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हणाली असेल तर फक्त त्या कारणावरून त्याने तिचा लैंगिक छळ केला असे म्हणता येणार नाही तसेच याप्रकरणी त्याला दोषी ठरविता येणार नाही .

रायपूर : एखादी व्यक्ती लैंगिक उद्देश न बाळगता अल्पवयीन मुलीला ‘आय लव्ह यू’ म्हणाली असेल तर फक्त त्या कारणावरून त्याने तिचा लैंगिक छळ केला असे म्हणता येणार नाही तसेच याप्रकरणी त्याला दोषी ठरविता येणार नाही असा निकाल छत्तीसगडउच्च न्यायालयाने दिला आहे. न्या. संजय अग्रवाल यांनी पुरेशा पुराव्याच्या अभावामुळे या प्रकरणातील आरोपीची निर्दोष मुक्तता केली.  १४ ऑक्टोबर २०१९ रोजी पंधरा वर्षे वयाची विद्यार्थिनी शाळेतून घरी परत येत असताना एका तरुणाने तिला रस्त्यात गाठले व ‘आय लव्ह यू’ म्हणत प्रेमाची कबुली दिली. 

शिक्षकांनी दिली होती समजहा युवक आपल्याला त्रास देत असल्याची तक्रार त्या विद्यार्थिनीने याआधीही केली होती व शिक्षकांनी त्याला समज दिली होती. मात्र त्या तरुणाने पुन्हा गैरकृत्य केल्याने तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर पोलिसांनी त्याच्यावर कारवाई केली. 

प्रकरणातील साक्षींवरून नेमके काय सिद्ध झाले?उच्च न्यायालयाने सर्व साक्षीपुरावे पाहून कनिष्ठ न्यायालयाचा निर्णयच कायम ठेवला. उच्च न्यायालयाने सांगितले की, आय लव्ह यू हे वाक्य लैंगिक द्योतक ठरत नाही. आरोपीने अल्पवयीन विद्यार्थिनीशी अश्लील भाषेत संवाद साधला नाही, अश्लील चाळे, हातवारे केले नाहीत. हे या प्रकरणातील साक्षींवरूनही सिद्ध झाले आहे. त्यामुळे आरोपीने या विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केला या आरोपात काहीही तथ्य नाही. विद्यार्थिनीची जात काय आहे याबद्दल या तरुणाला काहीही माहिती नव्हती. त्यामुळे एससी / एसटी अत्याचार प्रतिबंधक कायदाही या प्रकरणात लागू होत नाही.  

लैंगिक हेतू असल्यासच पोक्सोंतर्गत कारवाईयालयाने याप्रकरणी निकाल देताना २०२१मधील सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयाचा हवाला दिला. त्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आरोपीने लैंगिक हेतूने काही गैरकृत्य केले असेल तर त्याच्यावर पोक्सो कायद्यातील लैंगिक छळविषयक कलम लागू होईल. केवळ संवाद, एखादे वाक्य यांच्यावरून आरोपीने एखाद्याचा लैंगिक छळ केला असे सिद्ध होत नाही. तसा आरोप करणेही चुकीचे आहे असे छत्तीसगड न्यायालयाने म्हटले आहे. 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयChhattisgarhछत्तीसगड