तिरुअनंतपुरममधील कॉलेजात मुलींना जीन्स घालण्यास बंदी
By Admin | Updated: October 21, 2016 12:38 IST2016-10-21T12:10:09+5:302016-10-21T12:38:47+5:30
तिरुवनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालयाने विद्यार्थिनींना कॉलेजमध्ये येताना लेगिन्स आणि जिन्स न घालता फक्त साधे कपडे घालून येण्याची सूचना केली आहे

तिरुअनंतपुरममधील कॉलेजात मुलींना जीन्स घालण्यास बंदी
ऑनलाइन लोकमत
तिरुवनंतपुरम, दि. 21 - येथील एका कॉलेजने तालिबानी फतवा काढत मुलींना जीन्स आणि लेगिन्स घालण्यावर बंदी घातली आली आहे. तिरुवनंतपुरम वैद्यकीय महाविद्यालयात शिकणा-या विद्यार्थिनींसाठी हा ड्रेसकोड लागू करण्यात आला आहे. या ड्रेसकोडनुसार कॉलेजमध्ये येताना लेगिन्स आणि जिन्स न घालता फक्त साधे कपडे घालून येण्याची सूचना देण्यात आली आहे. इतकंच नाही तर मुलांच्या कपड्यांवरही बंंधनं आणण्यात आली असून साधे कपडे घालून येेण्याचे आदेशच देण्यात आले आहेत.
तिरुवनंतपुरम मेडिकल कॉलेजच्या उपप्राचार्यांनी ड्रेसकोडबाबतचे नवे परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात विद्यार्थिनींना चुडीदार किंवा साडी घालून कॉलेजमध्ये येण्याची सूचना करण्यात आली आहे. तर विद्यार्थ्यांनाही साधे कपडे घालून येण्यास सांगण्यात आले आहे.
दरम्यान, कॉलेजमध्ये ड्रेसकोड लागू करणारे हे पहिलेच कॉलेज नसून काही काळापूर्वी मदुराई मेडिकल कॉलेजनेही विद्यार्थ्यांसाठी ड्रेसकोड लागू केला होता. मदुराई मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता एस. रेवथे यांनी जिन्स पँट आणि टी शर्ट घालण्यास मनाई केली होती.