सुनावणी बंद करण्याच्या याचिकेवर 19 मे रोजी निवाडा

By Admin | Updated: April 26, 2016 00:16 IST2016-04-26T00:16:37+5:302016-04-26T00:16:37+5:30

मडगाव : रावणफोंड-मडगाव येथील वॉल्टर डायस व मायणा-कुडतरी येथील फेलिक्स डायस या दोघांनी आपल्यावरील सुनावणी बंद करण्यासाठी सत्र न्यायालयात केलेल्या याचिकेवर 19 मे रोजी निवाडा होण्याची शक्यता आहे.

Judgment on closure of hearings on May 19 | सुनावणी बंद करण्याच्या याचिकेवर 19 मे रोजी निवाडा

सुनावणी बंद करण्याच्या याचिकेवर 19 मे रोजी निवाडा

गाव : रावणफोंड-मडगाव येथील वॉल्टर डायस व मायणा-कुडतरी येथील फेलिक्स डायस या दोघांनी आपल्यावरील सुनावणी बंद करण्यासाठी सत्र न्यायालयात केलेल्या याचिकेवर 19 मे रोजी निवाडा होण्याची शक्यता आहे.
शासनातर्फे सरकारी अभियोक्ता सुभाष देसाई यांनी बाजू मांडली. मायणा-कुडतरी पोलिसांनी या दोघांविरुद्ध मडगाव प्रथमवर्ग न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. मोहम्मद शमीम शेख हे तक्रारदार आहेत. दि. 28 जानेवारी 2014 रोजी रात्री आठ वाजता फेलिक्स डायस व वॉल्टर डायस हे तक्रारदार राहात असलेल्या दिकरपाली-नावेली येथील घरात बळजबरीने शिरले व त्यांना अर्वाच्य शिवीगाळ करू लागले. घर खाली न केल्यास मुंबईतून गुंड आणू, अशी धमकीही दिली, असे आरोपपत्रात नमूद केले आहे.
दोन्ही संशयितांविरुद्ध दुसर्‍याच्या घरात घुसखोरी करुन धमकी दिल्यासंबंधी प्रथमदर्शनी पुरावा उपलब्ध असून, ही घटना पाहणारी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने या प्रकरणाची सुनावणी घेऊन पुरावा सादर करण्याची संधी अभियोग पक्षाला द्यावी, असा युक्तिवाद सरकारी अभियोक्ता सुभाष देसाई यांनी केला. आपल्याविरुद्ध मोहम्मद शेख यांनी खोटी तक्रार केल्याचा दावा संशयितांनी केला आहे.
मडगाव प्रथमवर्ग न्यायाधीश रैना फर्नांडिस यांनी भादंसंच्या कलम 448, 506 तसेच कलम 34 अंतर्गत आरोप निश्चित करण्याचा आदेश दिला असता, या निवड्याला सत्र न्यायालयात आव्हान देऊन आपल्याविरुद्धची सुनावणी रद्दबातल ठरविण्याची मागणी या संशयितांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Judgment on closure of hearings on May 19

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.