शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
पत्नीच्या डिलिव्हरीसाठी आलेल्या जवानाचे अपघाती निधन; बाप-लेकीची पहिली अन् शेवटची भेट
3
१८० किमी प्रति तास वेग, कपल कूप ते शॉवर सुविधा; स्लीपर वंदे भारत सेवेस सज्ज, १७ जानेवारीला…
4
फॉर्म भरण्याचा त्रास संपला! UPI द्वारे PF काढता येणार; अवघ्या काही सेकंदात पैसे बँक खात्यात जमा
5
“ठाकरेंना सांगा की लगेच १ लाख पाठवा”; फडणवीसांचे उत्तर, या पैशांचे काय करणार? तेही सांगितले
6
IND vs NZ : आधी हळू चेंडू टाकला मग वेग पकडला! दोन्ही सलामीवीरांचा हर्षित राणानं केला ‘करेक्ट कार्यक्रम'
7
सोने सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार! २०३० मध्ये १ ग्रॅमसाठी किती पैसे मोजावे लागतील? तज्ज्ञांचा इशारा
8
'ऑस्ट्रेलियन सुंदरी' एलिस पेरीने खरंच बाबर आझमला प्रपोज केलं? जाणून घ्या Viral Photoचे सत्य
9
‘ठाकरे अजूनही १० मिनिटांत मुंबई बंद करू शकतात…’, संजय राऊतांचं मोठं विधान
10
इंडियन आयडल-3 चा विजेता प्रशांत तमांग काळाच्या पडद्याआड; 43व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
11
"एक मंत्री आहे, नेपाळ्यासारखा...", नितेश राणेंवर टीका करताना अबू आझमींची जीभ घसरली
12
'X'वर अश्लील कंटेंट विरोधात अ‍ॅक्शन, ६०० अकाउंट डिलीट; मोदी सरकारच्या इशाऱ्यानंतर, इलॉन मस्क यांची कारवाई
13
महायुतीचा वचननामा: मुंबई लोकल अन् मेट्रोचा प्रवास करणाऱ्या मुंबईकरांसाठी जाहीरनाम्यात काय?
14
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
15
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
16
बनावट कोर्ट, खोटे न्यायाधीश आणि १५ कोटींचा गंडा; निवृत्त डॉक्टर दाम्पत्यासोबत मोठा फ्रॉड!
17
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
18
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
19
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
20
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
Daily Top 2Weekly Top 5

"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 12:18 IST

व्हिडिओच्या मूळ कॅप्शनमध्ये म्हणण्यात आले आहे की, “राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्याचे रुपांतर एका पीआर संकटात झाले आहे...

भारतीय जनता पक्षाचे (BJP) राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा यानी मंगळवारी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मत चोरीच्या आरोपांवरून खिल्ली उडवली आहे. जेपी नड्डा यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर एक व्हिडिओ रिपोस्ट करत काँग्रेस आणि विरोधी पक्षांवर टीका केली.

जेपी नड्डा यांनी व्हिडिओ केला रिपोस्ट -जेपी नड्डा यांनी 'एक्स'वर रीपोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या बिहारमध्ये सुरू असलेल्या मतदान अधिकार यात्रेचा एक भाग दाखवण्यात आला आहे. यात एक महिला, बिहारमध्ये निवडणूक आयोगाच्या विशेष सघन पुनरावलोकन (एसआयआर) प्रक्रियेअंतर्गत तिच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावे वगळल्यासंदर्भात तक्रार करताना दिसत आहे. मात्र, याच व्हिडिओच्या दुसऱ्या भागात, हीच महिला सागंत आहे की, तिला मतदान अधिकार यात्रेदरम्यान राहुल गांधींसमोर जाऊन हे बोलण्यास सांगण्यात आले होते.

व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये उडवली राहुल गांधींची खिल्ली -व्हिडिओ रिपोस्ट करत नड्डा यांनी राहुल गांधींची खिल्ली उडवली आहे. त्यांनी या व्हिडिओसोबत कॅप्शन देतांना, “खडा हूं आज भी वहीं... जहां मेरा झूठ पकडाया, सच सामने आया और मैंने अपना मजाक बनवाया... खडा हूं आज भी वहीं,” असे लिहिले आहे.

व्हिडिओच्या मूळ कॅप्शनमध्ये काय? तसेच, व्हिडिओच्या मूळ कॅप्शनमध्ये म्हणण्यात आले आहे की, “राहुल गांधींच्या मतचोरीच्या दाव्याचे रुपांतर एका पीआर संकटात झाले आहे. आधी निवडणूक आयोगाने राहुल गांधींना सर्व दाव्यांसंदर्भात पुरावे सादर करण्यासा 7 दिवसांचा अल्टीमेटम दिला आहे आणि आता लोकच त्यांना सर्व बाजूंनी उघडे पाडत आहे.

"कॅप्शनमध्ये पुढे म्हटले आहे, "हा एक स्क्रीप्टेड पीआर होता.  यात्रेदरम्यान आम्हाला मत चोरीसंदर्भात सांगण्यात आले होते. मात्र, आमची नावे मतदार यादीत आहेत. राहुल गांधींची पुढील माफी लवकरच येत आहे." 

टॅग्स :J P Naddaजगत प्रकाश नड्डाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगBJPभाजपा