गडहिंग्लजच्या हाळलक्ष्मीची यात्रा उत्साहात

By Admin | Updated: May 10, 2014 19:41 IST2014-05-10T19:41:41+5:302014-05-10T19:41:41+5:30

Journey to Haldalakshmi of Gadhinglj | गडहिंग्लजच्या हाळलक्ष्मीची यात्रा उत्साहात

गडहिंग्लजच्या हाळलक्ष्मीची यात्रा उत्साहात

>गडहिंग्लज :
गडहिंग्लजचे ग्रामदैवत असणार्‍या श्री हाळलक्ष्मी देवीची यात्रा उत्साहात पार पडली. संग्रामसिंह कदम व श्वेता कदम यांच्याहस्ते महाअभिषेक व पूजाविधी झाला. दुपारी नारायण कदम व जितेंद्र कोरी यांच्यासह सहकार्‍यांनी प्रसाद वाटप केले. सुमारे पाच हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला.
यानिमित्त श्री हाळलक्ष्मी व वडरगेच्या गोसावीनाथांच्या पालख्यांची भेट झाली. गणेश मंडळातर्फे घोडा पळविणे, टांगा घोडा व घोडागाडी शर्यती झाल्या. यात्रेच्या यशस्वीतेसाठी कुंभार, धनगर, नेवडे, पनोरे, भाट, गोंधळी, गोसावी समाजासह देवस्थानचे पदाधिकारी व विश्वस्त, वाचनालय, महिला बचत गट, नगरपरिषद व बड्याचीवाडी ग्रामपंचायतीने विशेष परिश्रम घेतले. (प्रतिनिधी)

Web Title: Journey to Haldalakshmi of Gadhinglj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.