जोगाळ्याच्या सरपंचास न्यायालयीन कोठडी शासकीय निधीचा घोळ : चार वर्षांनी झाली अटक
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:16+5:302015-02-14T23:51:16+5:30
शिरुर अनंतपाळ : शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी तालुक्यातील जोगाळा येथील सरपंच व ग्रामसेवकाविरुध्द चार वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलिसांनी गुरुवारी सरपंचास अटक करुन निलंगा न्यायालयासमोर हजर केले असता न्या़ सूर्यवंशी यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़

जोगाळ्याच्या सरपंचास न्यायालयीन कोठडी शासकीय निधीचा घोळ : चार वर्षांनी झाली अटक
श रुर अनंतपाळ : शासकीय निधीचा अपहार केल्याप्रकरणी तालुक्यातील जोगाळा येथील सरपंच व ग्रामसेवकाविरुध्द चार वर्षांपूर्वी गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी शिरूर अनंतपाळ पोलिसांनी गुरुवारी सरपंचास अटक करुन निलंगा न्यायालयासमोर हजर केले असता न्या़ सूर्यवंशी यांनी १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़तालुक्यातील जोगाळा येथील ग्रामपंचायतीस शासनाच्या विविध योजनांतून दोन लाख ५ हजार रुपयांचा निधी प्राप्त झाला होता़ या निधीचा तत्कालिन ग्रामसेवक पी़ एम़ कांबळे, तत्कालिन उपसरपंच व विद्यमान सरपंच हरिश्चंद्र धुमाळ यांनी अपहार केल्याने विस्तार अधिकारी बालाजी पोतदार यांच्या फिर्यादीवरुन या दोघांविरुध्द सन २०११ मध्ये कलम ४२०, ४०९ अन्वये शिरुर अनंतपाळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता़ याप्रकरणी ग्रामसेवक कांबळे यास अटक करण्यात आली होती़ त्यास निलंबितही करण्यात आले़ परंतु, गेल्या चार वर्षांपासून सरपंच हरिश्चंद्र धुमाळ यांना अटक झाली नव्हती़ गुरुवारी शिरुर अनंतपाळ पोलिसांनी सरपंच धुमाळ यांना अटक करुन निलंगा न्यायालयासमोर हजर केले असता न्या़ सूर्यवंशी यांनी सरपंचास चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे़ चौकट़़़याप्रकरणी सरपंचास अटक करण्यासाठी तब्बल चार वर्षांनी ठोस पुरावे मिळाले असल्याचे पोलिस ठाण्याच्या वतीने सांगण्यात आले़ याप्रकरणाचा तपास सपोउपनि गोविंद गुरव, बी़ पी़ मुंढे, बाळासाहेब देशमुख, पोपट गायकवाड, मुकुंद देशमुख यांनी केला़