शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता मराठीतही मेडिकल, इंजीनियरिंगचे शिक्षण घेणे शक्य होणार"! PM मोदींनी दिली आनंदाची बातमी
2
राहुल गांधींकडून वदवून घ्या की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल...; PM मोदींचं शरद पवारांना आव्हान
3
निकोलस पूरनने दोन खणखणीत सिक्स खेचले, अर्जुन तेंडुलकरने मैदान सोडले; नेमके काय घडले?
4
"ते गरीब-गरीब करत माळच जपायचे, मोदीने 25 कोटी लोकांना गरीबीतून बाहेर काढले"; पंतप्रधानांचा काँग्रेसवर हल्लाबोल 
5
प्रचारादरम्यान कन्हैया कुमार यांच्यावर हल्ला, हार घालण्यासाठी आलेल्या तरुणाने लगावली थप्पड!
6
'हा आत्मा तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही', शरद पवारांचा मोदींवर घणाघात
7
"...तर मोदी पंतप्रधान झालेच नसते", उद्धव ठाकरेंची भाजपावर सडकून टीका 
8
एका व्हिडीओने माझी वाट लावलीय! MI बाबतच्या विधानानंतर Rohit Sharma चा दुसरा Video Viral
9
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
10
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
11
निकोलस पूरन-लोकेश राहुल यांनी शतकी भागीदारी; मुंबईची हॅटट्रिक, पण LSG दोनशेपार 
12
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
13
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
14
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
15
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
16
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
17
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
18
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
19
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
20
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!

अडीच दिवसांचा गणपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 12:27 AM

सोशल मीडियातून येडियुरप्पांची खिल्ली

मुंबई : विश्वासदर्शक ठरावाला सामोरे जाण्यापूर्वीच मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची नामुष्की ओढावलेले बी. एस.येडियुरप्पा यांची सोशल मीडियातून भरपूर खिल्ली उडविण्यात आली. त्याचवेळी भाजपाप्रेमींनी काँग्रेस, राहुल गांधी यांची खेचण्याचा प्रयत्न केला.येडियुरप्पा यांना दोन पोलीस उचलून नेत असून बाजूला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर आणि मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष शेलार त्या पोलिसांना मदत करीत असल्याचे चित्र व्हायरल झाले. ‘अडीच दिवसांचा गणपती’ असे कॅप्शन या फोटोला देण्यात आले. ‘येडी ने फुलाया फुल... फुल को ले गया कुमार...!, अशी गमतीशीर प्रतिक्रियादेखील आली. ‘हातातोंडाशी आलेलं पिक वाया गेल्यावर शेतकऱ्याला कसं वाटतं हे आता भाजपाला कळलं असेल, अशी खोचक टिप्पणीही आली.‘येडियुरप्पा - अनिल कपूरनंतर सगळ्यात कमी दिवस राहिलेली मुख्यमंत्री’ अशी चेष्टाही करण्यात आली. ‘नायक’ चित्रपटात अनिल कपूरला एक दिवसाचा मुख्यमंत्री दाखविले होते हा संदर्भ त्यात होता. ‘फुकाच्या ठरल्या भाजपाच्या गप्पा, तोंडावर पडले येडियुरप्पा’, हा नारा फिरत होता. ‘वाटलेले पेढे परत घेण्यासाठी भाजपाच्या कार्यालयात मेळावा घेणार’ अशी कल्पनाशक्तीही लढविण्यात येत होती.विश्वेश्वरैय्यानंतर राहुल गांधींसमोर मोठे आव्हान. आता म्हणावे लागेल, हरदनहळ्ळी दोड्डेगौडा कुमारस्वामी’ अशी राहुल यांची विकेट घेऊ पाहणारी प्रतिक्रियाही चर्चेत होती.

टॅग्स :Yeddyurappaयेडियुरप्पाKarnataka Assembly Elections 2018कर्नाटक विधानसभा निवडणूक २०१८