हॉकर्स बातमील जोड...

By Admin | Updated: April 5, 2016 00:15 IST2016-04-05T00:15:27+5:302016-04-05T00:15:27+5:30

आयुक्तांचा सत्कार

Join Hawker News ... | हॉकर्स बातमील जोड...

हॉकर्स बातमील जोड...

ुक्तांचा सत्कार
न्यू बी.जे. मार्केटमध्ये हॉकर्सचे पुनर्वसन करण्यात आलेल्या यशाच्या पार्श्वभूमीवर हॉकर्स संघटनांतर्फे मनपा आयुक्त संजय कापडणीस यांचा सत्कार करण्यात आला. संघटनांचे पदाधिकारीही यावेळी उपस्थित होते. यांनतर आयुक्त संजय कापडणीस, न्यू बी.जे. मार्केटचे अध्यक्ष किशोर भोसले, नगरसेवक बंटी जोशी व व्यापारी असो. पदाधिकार्‍यांच्या उपस्थितीत बैठक पत्रकार परिषद घेण्यात येऊन झालेली चर्चा व निघालेला तोडगा आदी विषयांची माहिती देण्यात आली.
-----------
-न्यू बी.जे.त जागा मिळणार असलेल्या हॉकर्सची संख्या - २५०
- पहिल्या दिवशी गाड्या लावलेल्या हॉकर्सची संख्या - २००
- ए विंग समोर असतील २६ हॉकर्स
- बी विंग समोर असतील १४० हॉकर्स
- उर्वरित हॉकर्सला सी विंग समोर मिळणार जागा
------
असा निघाला तोडगा
न्यू बी.जे. मार्केटमध्ये रेडक्रॉसच्या बाजूने असलेल्या चारपैकी एक रांग कमी केली जाणार.
- व्यापार्‍यांच्या गाड्या पार्किंगसाठी ३० फूट जागा पूर्ण मोकळी सोडली जाणार. त्या भागात हॉकर्सची गाडी नसेल.
- मार्केटमधील डी व ए विंग रहदारीच्या दृष्टीने पूर्णत: मोकळी सोडली जाणार
- गॅरेजवाल्यांना गाड्या काढून पेट्या बसविण्याच्या सूचना
-गॅरेजच्या बाजूने मोकळ्या होणार्‍या जागेत २६ हॉकर्सला दिली जाणार जागा.
- हॉकर्सला ठरवून दिलेल्या जागांच्या तीनही ठिकाणी मनपातर्फे बॅरिकेट्स बसविण्याची प्रक्रिया मंगळवारपासून.
-

Web Title: Join Hawker News ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.