सर्वसाधारण सभा बातमी जोड

By Admin | Updated: January 23, 2015 23:06 IST2015-01-23T23:06:26+5:302015-01-23T23:06:26+5:30

इन्फो..

Join the general public news | सर्वसाधारण सभा बातमी जोड

सर्वसाधारण सभा बातमी जोड

्फो..
कांडप यंत्रे कालवंडली
समाजकल्याण विभागाच्या तीन कोटी १० लाखांच्या निधीतून दलितवस्ती सुधार योजनेची कामे घेण्यासाठी आयुक्तांकडे गेलेला प्रस्ताव रखडल्याने या निधीतून वेगळ्या योजना घेण्याचा प्रस्ताव होता. त्यास गटनेते प्रवीण जाधव यांनी हस्तक्षेप करीत या नवीन योजनेत महिलांसाठी मिरची कांडप यंत्रे घेण्याची सूचना केली. मात्र त्यास बंडू गांगुर्डे व सभापती उषा बच्छाव यांनी विरोध करीत आहे तो प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी सभागृहाला केली. अखेर सभागृहाने समाजकल्याण विभागाचा नवीन प्रस्ताव मंजूर करीत कांडप यंत्रे पुरविण्याचा प्रस्ताव पुढील वर्षी घेण्याचा निर्णय झाला.
...तर शाखा अभियंत्यावर कारवाई
शाखा अभियंते अंदाजपत्रके बनवित नाहीत. त्यासाठी सदस्यांनाच धावपळ करावी लागते, अशा शाखा अभियंत्यावर कारवाई करणार काय? अशी विचारणा यतिन पगार व शैलेश सूर्यवंशी यांनी केली. प्रा. अशोक जाधव यांनीही कार्यकारी अभियंता अनिल अहिरे जाणून बुजून मंजूर कामे अडवून ठेवतात, असा आरोप केला. जर कोणी शाखा अभियंता कामे करीत नसेल तर त्याच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल, अशा सूचना सुखदेव बनकर यांनी केल्या.
माणसे वाचवा हो
सर्वच सदस्य रस्ते आणि गावतळ्यांच्या कामांवरून भांडत असताना पेशाने डॉक्टर असलेल्या डॉ. भारती पवार यांनी मात्र ग्रामीण भागाच्या आरोग्य व्यवस्थेवर ताशेरे ओढले. डॉक्टर मुख्यालयी थांबत नाहीत, आरोग्यसेवकच कारभार पाहतात, त्यातून ठेंगोंडा येथील गर्भवती महिलेच्या मृत्युसारखे प्रकार घडतात. त्यामुळे सर्वच वैद्यकीय अधिकार्‍यांना मुख्यालयी थांबण्याचे आदेश द्यावेत. तसेच सर्वच ग्रामीण रुग्णालये व उपजिल्हा रुग्णालयात रक्ताच्या पिशव्यांचा साठा असावा. जेणेकरून रुग्ण वाचू शकतील, अशी मागणी डॉ. भारती पवार यांनी केली. त्यावर मुख्य कार्यकारी अधिकारी सुखदेव बनकर यांनी वैद्यकीय अधिकार्‍यांना कडक सूचना केल्या असून, रुग्णांची काळजी घेण्याचे आदेश दिल्याचे स्पष्ट केले.
कामांची चौकशी करा
राज्यपाल आदिवासी गावांचा व तालुक्यांचा दौरा करणार असून, जिल्‘ातील नऊ आदिवासी तालुक्यात झालेल्या कामांमधील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचा ठराव संपतराव सकाळे यांनी मांडला. त्याची सुरुवात लवकर करण्याची सूचना नितीन पवार यांनी केली. नितीन पवार यांनीच कळवण तालुक्यात १० टक्क्यांपेक्षा जास्त कमी दराने सुमारे दीड कोटींची रस्त्यांची कामे घेण्यात आली असून, याकामांचा दर्जा काय राहील? त्याची जबाबदारी कोण घेणार? या कामांची अनामत रक्कम १० टक्क्यांनी वाढविण्याची मागणी केली.

Web Title: Join the general public news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.