शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

भारतात Johnson and Johnson च्या सिंगल डोस Covid-19 लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 7, 2021 14:26 IST

Coronavirus Vaccine : केंद्रीय मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली माहिती. भारतातकडे आता ५ EUA लसी असल्याचं मांडविया यांचं वक्तव्य.

ठळक मुद्देभारतातकडे आता ५ EUA लसी असल्याचं मांडवीय यांचं वक्तव्य.सध्या भारतात राबवण्यात येत आहे मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम.

देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे हाहाकार माजला होता. सध्या दुसऱ्या लाटेचं प्रमाण काहीसं कमी झालं असलं, तरी तिसऱ्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या पार्श्वभूमीवर केंद्रानं मोठ्या प्रमाणात लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. दरम्यान, आता भारतात ग्लोबल हेल्थकेअर प्रमुख जॉन्सन अँड जॉन्सनच्या (Johnson and Johnson) सिंगल डोसच्या करोना प्रतिबंधात्मक लसीला मान्यता देण्यात आली आहे. 

केंद्रीय आरोग्यमंत्री मनरसुख मांडविया यांनी यासंदर्भातील माहिती दिली. "भारतानं आपल्या वॅक्सिन बास्केटचा विस्तार केला  आहे. जॉन्सन अँड जॉन्सन च्या सिंगल डोसच्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या आपात्कालिन वापरास मंजुरी देण्यात आली आहे. आता भारताकडे ५ EUA लसी आहेत," असं मांडविया म्हणाले. ६ ऑगस्ट रोजी कंपनीनं माहिती देत आपल्या सिंगल डोस लसीच्या आपात्कालिन वापरास अर्ज केल्याचं सांगितलं होतं. "५ ऑगस्ट २०२१ रोजी जॉन्सन अँड जॉन्सन प्रायव्हेट लिमिटेडनं भारत सरकारकडे आपल्या सिंगल डोस कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या आपात्कालिन वापरासाठी अर्ज केला होता," असं कंपनीच्या प्रवक्त्यांकडून सांगण्यात आलं. सध्या देशात Covaxi, Covishield आणि रशियाच्या Sputnik V चे डोस नागरिकांना देण्यात येत आहेत. या तिन्ही लसींचे दोन डोस घेणं आवश्यक आहे.   ५० कोटी लसीकरणाचा टप्पा पारदेशामध्ये लसीचा डोस घेणाऱ्यांची संख्या ५० कोटींवर गेली असून एकीकडे रूग्णवाढ होत असतानाच लसीकरणाचे दिलासादायक चित्रही समोर आलं आहे. यामध्ये पहिला डोस घेणारे ३९ कोटी तर दुसरा डोस पूर्ण करणाऱ्या ११ कोटी नागरिकांचा समावेश आहे. "भारताच्या कोरोनाविषय लढ्याला मोठी प्रेरणा मिळाली आहे. कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या संख्येनं ५० कोटींचा टप्पा पार केला आहे. सर्वांना लस मोफत लस या मोहिमेखाली आपल्या नागरिकांना लस दिली जाईल आणि यात मोठ्या प्रमाणात भर पडेल अशी आहे," असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यापूर्वी म्हणाले होते.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याIndiaभारतHealthआरोग्य