शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

'भारतात नोकऱ्यांचा दुष्काळ; पुरेशा विकासाचा अभाव'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2018 06:21 IST

अर्थव्यवस्था कमकुवत : १० टक्क्यांहून अधिक विकास दराची गरज

नवी दिल्ली : डिजिटायझेशनमुळे बँकिंग व वित्त सेवा क्षेत्रात चांगल्या नोकºया निर्माण होण्याचा अंदाज असला तरी, वास्तवात देशात नोकºयांचा दुष्काळ आहे. मुबलक नोकºया देण्याइतक्या विकास भारतात झालेला नाही. बँकिंग क्षेत्राची नाजूक स्थिती, थंडावलेल्या आर्थिक सुधारणा या कारणांमुळे अर्थव्यवस्था कमकुवत झाली आहे. नोकºयांचा दुष्काळ दूर करण्यासाठी भारताला १० टक्क्यांहून अधिक आर्थिक विकस दराची गरज तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

भारताचा आर्थिक विकास दर (जीडीपी) चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत ८.२ टक्के असल्याचे शुक्रवारी जाहीर करण्यात आले. परंतु भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा दर पुरेसा नाही. चीनच्या तुलनेत भारत अद्याप खूप मागे आहे. भारतातील १.२० कोटी तरुणांना रोजगार मिळण्यासाठी कामगार कायद्यात आमूलाग्र सुधारणा कराव्या लागतील, असे गोल्डमॅन सॅच्स अ‍ॅसेट मॅनेजमेंटचे माजी प्रमुख जीम ओ नेल यांनी सांगितले. रेल्वेने अलीकडे ९० हजार जागा भरण्याची घोषणा करताच २.८० कोटी युवकांचे अर्ज आले होते. यावरूनच नोकºयांची भीषणता स्पष्ट होते, असे ओ नेल यांचे म्हणणे आहे.

जागतिक बँकेचे वरिष्ठ अर्थतज्ज्ञ एजाझ घनी यांच्यानुसार, भारतातील उत्पादन व तांत्रिक विकास मर्यादित आहे. त्याचा फटका रोजगारनिर्मितीला बसत आहे. डिजिटायझेनमुळे कौशल्यावर आधारित नोकºया तयार होत आहेत. पण कौशल्याचा अभाव असलेल्या कामगारांना नोकºया गमवाव्या लागत आहेत. नोकºयांच्या अभावामुळे ‘गुंतवणुकीचे केंद्र’ म्हणून असलेली भारताची आंतरराष्टÑीय प्रतिमा मलिन होत आहे. ती बदलण्यासाठी केंद्र सरकारने कसोशीने प्रयत्न करण्याची गरज आहे.नोकऱ्यांबाबत निश्चित ‘डेटा’च नाहीदरवर्षी १ कोटी रोजगारनिर्मितीचे आश्वासन पंतप्रधान मोदी यांनी २०१४ मध्ये दिले होते. पण गेल्या चार वर्षांत मिळूनही इतक्या नोकºया निर्माण झालेल्या नाहीत. भविष्य निर्वाह निधी संघटनेने नोकºयांचा डेटा जाहीर केला. त्याद्वारे देशात नोकºया वाढल्याचे चित्र उभे करण्यात आले. वास्तवात नोकºया किंवा बेरोजगारीचे इत्थंभूत प्रमाण सांगणारा कुठलाही निश्चित डेटा भारतात उपलब्ध नाही. त्यामुळे या समस्येचे गांभीर्य सरकारच्या ध्यानात आलेले नाही, असे तज्ज्ञ सांगतात. 

टॅग्स :jobनोकरीIndiaभारतEmployeeकर्मचारी