शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

JOB Alert : खूशखबर! भारतीय तटरक्षक दलामध्ये नोकरीची सुवर्णसंधी, जाणून घ्या, कसा करायचा अर्ज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2021 20:06 IST

Indian Coast Guard Recruitment 2021 : भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्ट गार्डमध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे.

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. भारतीय तटरक्षक दल म्हणजेच इंडियन कोस्ट गार्डमध्ये (Indian Coast Guard Recruitment 2021) नोकरीची सुवर्णसंधी आहे. असिस्टंट कमांडंटसाठी (Assistant Commandant) 50 जागांवर भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे इंडियन कोस्ट गार्डने आपल्या अधिकृत वेबसाईटवर भरतीबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. भारतीय तटरक्षक दलामध्ये एकूण 50 जागांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 4 जुलैपासून सुरू होणार आहे. 

भारतीय तटरक्षक दलाच्या नोटिफिकेशननुसार असिस्टंट कमाडंट या पदांसाठी भरती होणार आहे. पात्र उमेदवार भारतीय तटरक्षक दलाच्या https://joinindiancoastguard.cdac.in/ या वेबसाईटवर भेट देऊन अर्ज सादर करू शकतात. अर्ज सादर करण्याची मुदत 4 जुलै ते 14 जुलैच्या दरम्यान आहे. भारतीय तटरक्षक दलाच्या वेबसाईटवर मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीद्वारे नोंदणी करू शकतात. इंडियन कोस्टगार्डच्या माहितीनुसार, एकूण असिस्टंट कमांडंटच्या 50 पदांवर भरती होणार आहे. जनरल ड्युटीसाठी 40 जागा भरल्या जातील यामध्ये 11 जागा खुल्या, ईडबल्यूएससाठी 3, ओबीसीसाठी 7, एससीसाठी 6 आणि एसटीसाठी 13 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. 

टेक्निकल इंजिनिअर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअरसाठी 10 जागांवर भरती होणार आहे. इंडियन कोस्टगार्डमध्ये जनरल ड्युटी पदावर अर्ज करणारे उमेदवार पदवीधर असावेत. मात्र, बारावीला विज्ञान शाखेतून गणित आणि भौतिकशास्ज्ञ विषयासह 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण झालेले असावेत. टेक्निकल इंजिनिअर आणि इलेक्ट्रिकल इंजिनिअर पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन डिल्पोमा, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स किंवा इंडस्ट्री अँड प्रोडक्शन, आटोमोटिव, किंवा मरिन आकर्किटेक्चर यामधील पदवी उत्तीर्ण झालेले असावेत. अर्ज करण्यपूर्वी उमेदवारांनी ऑफिशियल वेबसाईटवर जाऊन नोटिफिकेशन पाहणं आवश्यक आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

दहावी पास असणाऱ्यांसाठी नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये (National Hydraulic Power Corporation) अप्रेंटीस (Apprentice Jobs) पदांसाठी भरती आहे. नोटिफिकेशननुसार, ट्रेड अ‍ॅप्रेंटिसच्या एकूण 11 रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी इच्छूक असणारे उमेदवार नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कॉर्पोरेशनची अधिकृत वेबसाईट nhpc.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै आहे. या पदांसाठी उमेदवारांनी आयटीआयसह दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. गुणवत्तेच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. इच्छुक उमेदवार हे दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच त्यांनी ITI पास असणं गरजेच आहे. उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असणे आवश्यक आहे. SC / ST साठी पाच वर्षे, OBC साठी तीन वर्षे आणि शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्यांसाठी 10 वर्षांची सवलत असेल.

टॅग्स :jobनोकरीIndiaभारत