lokmat Supervote 2024
Lokmat Money > बिझनेस न्यूज > JOB Alert : खूशखबर! दहावी पास असणाऱ्यांसाठी नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

JOB Alert : खूशखबर! दहावी पास असणाऱ्यांसाठी नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

JOB Alert National Hydraulic Power Corporation : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2021 10:20 PM2021-06-21T22:20:48+5:302021-06-21T22:30:09+5:30

JOB Alert National Hydraulic Power Corporation : नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे.

JOB Alert nhpc recruitment 2021 for trade apprentice posts sarkari naukri govt jobs | JOB Alert : खूशखबर! दहावी पास असणाऱ्यांसाठी नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

JOB Alert : खूशखबर! दहावी पास असणाऱ्यांसाठी नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची सुवर्णसंधी, परीक्षेशिवाय होणार नियुक्ती

नवी दिल्ली - नोकरीच्या शोधात असणाऱ्यांसाठी आता एक खूशखबर आहे. नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कॉर्पोरेशनमध्ये (National Hydraulic Power Corporation) अप्रेंटीस (Apprentice Jobs) पदांसाठी भरती आहे. नोटिफिकेशननुसार, ट्रेड अ‍ॅप्रेंटिसच्या एकूण 11 रिक्त जागा आहेत. या नोकरीसाठी इच्छूक असणारे उमेदवार नॅशनल हायड्रॉलिक पॉवर कॉर्पोरेशनची अधिकृत वेबसाईट nhpc.gov.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची अंतिम तारीख 15 जुलै आहे. या पदांसाठी उमेदवारांनी आयटीआयसह दहावी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. गुणवत्तेच्या आधारे पात्र उमेदवारांची निवड केली जाणार आहे. 

जागा

एकूण जागा -  11

इलेक्ट्रीशियन (Electrician) - 5

प्लम्बर (plumber) - 1

संगणक ऑपरेटर व प्रोग्रामिंग सहाय्यक (Computer Operator) - 3

स्टेनोग्राफर (Stenographer) आणि सचिवालय सहाय्यक - 3

शैक्षणिक पात्रता

इच्छुक उमेदवार हे दहावी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तसेच त्यांनी ITI पास असणं गरजेच आहे.

वयोमर्यादा

उमेदवाराचे किमान वय 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 30 वर्षे असणे आवश्यक आहे. SC / ST साठी पाच वर्षे, OBC साठी तीन वर्षे आणि शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्यांसाठी 10 वर्षांची सवलत असेल.

निवड प्रक्रिया

आयटीआय व दहावीच्या गुणांमधील गुणवत्तेच्या आधारे उमेदवारांची निवड केली जाईल.

apprenticeshipindia.org या वेबसाईटवर जाऊन उमेदवारांनी अर्ज करायचा आहे.

भरतीसंदर्भातील अधिक माहितीसाठी nbpshr@nhpc.nic.in यावर मेल करू शकता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

Web Title: JOB Alert nhpc recruitment 2021 for trade apprentice posts sarkari naukri govt jobs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.