शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

भाजपा नेता म्हणतो, दीपिका तुकडे-तुकडे गँगची समर्थक; तिच्या चित्रपटांवर बहिष्कार घाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 08:57 IST

जेएनयूच्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्यानं दीपिकाविरोधात भाजपा आक्रमक

नवी दिल्ली: जवाहरलाल नेहरू विद्यापीठात झालेल्या हिंसाचाराच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांची अभिनेत्री दीपिका पादुकोणनं काल संध्याकाळी भेट घेतली. आपण आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांसोबत असल्याचं यावेळी दीपिकानं म्हटलं. मात्र दीपिकानं माध्यमांशी बोलणं टाळलं. पावणे आठ वाजता जेएनयूच्या परिसरात पोहोचलेली दीपिका जवळपास १० मिनिटं आंदोलनस्थळी उपस्थित होती. यावेळी जेएनयू विद्यार्थी संघटनेचे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार 'जय भीम'च्या घोषणा देत होते. दीपिका पादुकोणनं जेएनयूमधील आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेताच भाजपाकडून तिच्यावर टीका सुरू झाली. दीपिकानं तुकडे-तुकडे आणि अफझल गँगचं समर्थन केलं आहे. त्यामुळे तिच्या चित्रपटांवर बहिष्कार घालण्यात यावा, असं आवाहन भाजपाचे प्रवक्ते तेजिंदर पाल सिंह बग्ग यांनी केलं आहे. तर अभिनेत्री स्वरा भास्करनं दीपिकाचं कौतुक केलं. दीपिकानं जेएनयूच्या आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतल्याबद्दल सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. #boycottchhapaak आणि #ISupportDeepika असे दोन हॅशटॅग ट्विटरवर ट्रेंड होत आहेत.  दिल्ली पोलिसांनी जेएनयूच्या विद्यार्थी संघटनेची अध्यक्ष आइशी घोषसह १९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सर्व्हर रुममध्ये तोडफोड केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रविवारी झालेल्या हिंसाचारात आइशी घोष जखमी झाली. तिच्या डोक्याला जखम झाली. त्यातून बराच रक्तस्रावदेखील झाला. घोषसोबतच साकेत मून, सतीश यादव, सारिका चौधरी आणि इतरांविरोधातही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. भारतीय दंड विधानाच्या (आयपीसी) कलम ३४१, ३२३ आणि ५०६ च्या अंतर्गत हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. जेएनयूमध्ये रविवारी संध्याकाळी माक्सधारी व्यक्तींनी तोडफोड केली. हिंदू राष्ट्र दलानं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. दलाचे प्रमुख भूपेंद्र तोमर यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध करत जेएनयूमध्ये देशविरोधी कारवाया सुरू असल्याचा गंभीर आरोप केला. देशविरोधी आणि हिंदूविरोधी कारवाया रोखण्यासाठी जेएनयूमध्ये तोडफोड केल्याचं म्हणत त्यांनी या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. मात्र अद्याप तोमर किंवा त्यांच्या संघटनेतील कोणाविरोधातही पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला नाही. 

टॅग्स :Deepika Padukoneदीपिका पादुकोणjnu attackजेएनयूkanhaiya kumarकन्हैय्या कुमार