ज्ञानपीठ विजेते लेखक यू. आर. अनंतमुर्ती यांचे निधन
By Admin | Updated: August 22, 2014 19:24 IST2014-08-22T18:56:14+5:302014-08-22T19:24:42+5:30
ज्ञानपीठ विजेते लेखक यु.आर. अनंतमुर्ती यांचे मंगळवारी दिर्घ आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ८२ वर्षांचे होते.
ज्ञानपीठ विजेते लेखक यू. आर. अनंतमुर्ती यांचे निधन
>ऑनलाइन लोकमत
बेंगळूरु, दि. २२ - ज्ञानपीठ विजेते लेखक यु.आर. अनंतमुर्ती यांचे मंगळवारी दिर्घ आजाराने निधन झाले आहे. मृत्यूसमयी ते ८२ वर्षांचे होते. गेले अनेक दिवस डायलिसिसवर असलेल्या अनंतमूर्तींची प्रकृती आज सकाळपासून खालावली होती. निर्भिड लेखक, उदारमतवादी, ठाम विचारांचे आणि पुरोगामी अशी ओळख असलेल्या अनंतमूर्तींनी प्रचंड टीकेला न जुमानता नरेंद्र मोदींच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारीला विरोध केला होता.
२१ डिसेंबर १९३२ साली शिमोगा जिल्ह्यातील मेलिजे या गावी त्यांचा जन्म झाला. उडपी राजगोपालाचारी मुर्ती असे त्यांचे पुर्ण नाव होते. ध्रुवसपुरा या शाळेतून संस्कृत माध्यमातून शिक्षणपूर्ण केल्यावर त्यांनी म्हैसूर विद्यापीठातून एम.ए केलं. अनंतमुर्ती यांना शिक्षण आणि साहित्याची आवड होती. त्यांनी बर्निंगहॅम विद्यापीठातून डॉक्टरेट मिळवली होती. पुन्हा भारतात येऊन त्यांनी प्राध्यापक म्हणून आपल्या करिअरची सुरवात केली. केरळा विद्यापीठाचे कुलगुरु पद, तसेच नॅशनल बुकट्रस्ट चे अध्यक्ष अशा महत्वाची पदे त्यांनी भुषवली होती. संस्कार, भारती पुर्वा, अवस्थे या कथानकांना अनेक पुरस्कार मिळाले. तसेच त्यांच्या अनेक कथांवर चित्रपट व मालिकांची निर्मिती करण्यात आली. १९९४ साली अनंतमुर्ती यांना साहित्य क्षेत्रात अतिशय मानाचा समजला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. तसेच राज्योत्सव, मास्ती, पद्मभुषण व इतर अनेक महत्वाचे पुरस्कार मिळाले होते. त्यांच्यामागे पत्नी इस्थर, मुलगा शरथ व मुलगी अनुराथा असा परिवार आहे.