केदारनाथ सिंह यांना ज्ञानपीठ पुरस्कार
By Admin | Updated: June 21, 2014 02:15 IST2014-06-21T02:15:59+5:302014-06-21T02:15:59+5:30
आधुनिक पिढीचे हिंदी साहित्यिक केदारनाथ सिंह यांना 2क्13 चा साहित्याच्या क्षेत्रतील सर्वोच्च ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

केदारनाथ सिंह यांना ज्ञानपीठ पुरस्कार
>नवी दिल्ली : आधुनिक पिढीचे हिंदी साहित्यिक केदारनाथ सिंह यांना 2क्13 चा साहित्याच्या क्षेत्रतील सर्वोच्च ‘ज्ञानपीठ’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
सीताकांत महापात्र यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने
केदारनाथ सिंह यांना 49वा ज्ञानपीठ पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला. ‘अभी बिल्कुल अभी’, ‘जमीन पक रही हैं’, ‘यहाँ से देखो’, ‘अकाल में सारस’, ‘सृष्टी पर पहरा’, ‘मेरे समय के शब्द’, ‘कल्पना और छायावाद’ आदी त्यांच्या प्रमुख साहित्यकृती आहेत.
सुमित्रनंदन पंत, रामधारी सिंह ‘दिनकर’, सच्चिदानंद हीरानंद वात्स्यायन ‘अ™ोय’, महादेवी वर्मा, नरेश मेहता,
निर्मल वर्मा, कुंवर नारायण, श्रीलाल
शुक्ल आणि अमरकांत यांना याआधी ज्ञानपीठ पुरस्काराने गौरवण्यात आले आहे. पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मल्याळी साहित्यिक जी. शंकर कुरुप यांना 1965मध्ये प्रदान करण्यात आला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)