Jammu Kashmir : जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे नवे षडयंत्र; 200 लोक निशाण्यावर, सुरक्षा दल सतर्क!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 04:00 PM2021-10-14T16:00:36+5:302021-10-14T16:01:28+5:30

Target Killing : 21 सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये दहशतवादी संघटनांची बैठक आयोजित झाल्याचेही अहवालातून समोर आले आहे. या बैठकीत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तय्यबा, हिजबुल मुजाहिदीन आणि अल बदर यासह अनेक दहशतवादी संघटनांचे दहशतवादी सहभागी होते.

Jmmu Kashmir Terrorists Prepare List of 200 People as Target Killing | Jammu Kashmir : जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे नवे षडयंत्र; 200 लोक निशाण्यावर, सुरक्षा दल सतर्क!

Jammu Kashmir : जम्मू -काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे नवे षडयंत्र; 200 लोक निशाण्यावर, सुरक्षा दल सतर्क!

Next

नवी दिल्ली :  जम्मू -काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवादी (Terrorist) पुन्हा एकदा दहशत पसरवण्याच्या तयारीत आहेत. गुप्तचर रिपोर्टमधून हे समोर आले आहे की, दहशतवाद्यांनी जम्मू -काश्मीरमध्ये टारगेट किलिंगसाठी (Target Killing) 200 लोकांची यादी तयार केली आहे. या यादीमध्ये गुप्तचर संस्था, माहिती देणारे, केंद्र सरकार आणि लष्कराच्या जवळचे मानले जाणारे माध्यम प्रतिनिधी, खोऱ्याबाहेरील लोक आणि काश्मिरी पंडितांची नावे, त्यांच्या वाहनांच्या नंबरसह समाविष्ट आहेत. (Jammu Kashmir Terrorists Prepare List of 200 People as Target Killing)

21 सप्टेंबर रोजी पाकिस्तानच्या मुझफ्फराबादमध्ये दहशतवादी संघटनांची बैठक आयोजित झाल्याचेही अहवालातून समोर आले आहे. या बैठकीत जैश-ए-मोहम्मद, लष्कर-ए-तय्यबा, हिजबुल मुजाहिदीन आणि अल बदर यासह अनेक दहशतवादी संघटनांचे दहशतवादी सहभागी होते. अहवालात असे म्हटले आहे की, सर्व तंजीमांच्या लोकांना एकत्र करून एक नवीन दहशतवादी संघटना स्थापन केली जाईल. जी केवळ माहिती देणारे, गुप्तचर यंत्रणेचे लोक, खोऱ्याच्या बाहेरचे लोक आणि आरएसएस आणि भाजपाचे लोकांना टारगेट करतील.

अहवालानुसार, बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे की, येत्या काळात हा तंजीम खोऱ्यातील टारगेटेड किलिंग्सची जबाबदारी घेईल. यासाठी उरी आणि तंगधर मार्गे सीमेपलीकडून ग्रेनेड आणि पिस्तूल पाठवले जात आहेत. तसेच, 5 ऑक्टोबर रोजी विक्रेता वीरेंद्र पासवानची हत्या, हे चुकीच्या ओळखीचे प्रकरण असू शकते, असेही अहवालातून स्पष्ट झाले आहे.

दरम्यान, जम्मू -काश्मीरमध्ये सुरक्षा दलांच्या जबरदस्त कारवाईमुळे दहशतवाद्यांचे कंबरडे मोडले आहे. वेगवेगळ्या दहशतवादी संघटनांचे मोठे कमांडर सातत्याने मारले जात आहेत. अशा स्थितीत संतापलेल्या दहशतवाद्यांनी सरकार आणि सुरक्षा यंत्रणांना माहिती देणारे निष्पाप आणि निशस्त्र लोकांची हत्या करण्यास सुरुवात केली आहे. तेही एका विशिष्ट समुदायाच्या लोकांची हत्या करण्यात येत आहे.

लोकांच्या धार्मिक भावना भडकवून खोऱ्यात अशांतता आणि हिंसा पसरवणे, हा यामागील दहशतवाद्यांचा हेतू आहे. दरम्यान, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या सूचनेवरून दहशतवादी करत असलेल्या या टारगेटेड किलिंग्सवर सुरक्षा दलाचे बारीक लक्ष आहे. पोलीस आणि प्रशासनाने त्यांची दक्षता वाढवली आहे.

Web Title: Jmmu Kashmir Terrorists Prepare List of 200 People as Target Killing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app