शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

"फरार नाहीत हेमंत सोरेन, ऑपरेशन लोटसपासून वाचवायचंय", झामुमोची मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी बैठक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2024 11:01 IST

hemant soren : मुख्यमंत्री लवकरच आपल्यात येणार असल्याचे मनोज पांडे यांनी सांगितले.

कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या ईडीच्या चौकशीपूर्वी झारखंड मु्क्ती मोर्चाने (झामुमो) आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महाआघाडीच्या विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली आहे. झामुमोचे प्रवक्ते मनोज पांडे यांनी ही माहिती दिली आहे. हेमंत सोरेन हे फरार नाहीत. मुख्यमंत्री लवकरच आपल्यात येणार आहेत. ते कुठे आहेत हे आम्ही सांगू शकत नाही. ही आमची रणनीती आहे. मात्र निवडून आलेल्या मुख्यमंत्र्यांना त्रास दिला जात आहे, असे मनोज पांडे यांनी सांगितले. 

झामुमोच्या प्रवक्त्याने सांगितले की, पुढील ४८ तास अत्यंत महत्त्वाचे आहेत. निवडून आलेल्या सरकारला ऑपरेशन लोटसपासून वाचवायचे आहे. झारखंडला वाचवायचे आहे. आदिवासी असणे हा गुन्हा आहे का? ते फरारी नाहीत. इतकी अस्वस्थता का आहे? हा आदिवासींचा अपमान आहे. हा संपूर्ण झारखंडचा अपमान आहे. मुख्यमंत्री लवकरच आपल्यात येणार असल्याचे मनोज पांडे यांनी सांगितले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हेमंत सोरेन यांची ईडीच्या चौकशीपूर्वी आज मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी महाआघाडीच्या आमदारांची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन स्वत: या बैठकीच्या अध्यक्षस्थानी असतील. आमदारांना एकजूट ठेवण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी होणाऱ्या या बैठकीला आमदार बॅग आणि सामान घेऊन उपस्थित राहू शकतात. 

महाआघाडीच्या बैठकीपूर्वी काँग्रेस आमदारांची बैठक मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी ११ वाजल्यापासून काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे, तर महाआघाडीच्या सर्व आमदारांची बैठक मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पहाटे २:०० नंतर होणार आहे. महाआघाडीच्या बैठकीपूर्वी झारखंड प्रदेश काँग्रेसचे प्रभारी गुलाम अहमद मीर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस आमदारांची बैठक होणार आहे. या बैठकीत सध्याच्या राजकीय परिस्थितीसोबतच राहुल गांधी यांची झारखंडमध्ये होणारी भारत जोड न्याय यात्रा हा मुख्य अजेंडा असणार आहे. 

हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार जप्तदरम्यान, कथित जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन अडचणीत सापडले आहेत.सोमवारी ईडीने त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानावर छापा टाकला होता. यावेळी ईडीच्या पथकाने काही कागदपत्रे आणि हेमंत सोरेन यांची बीएमडब्ल्यू कार जप्त केली होती. हेमंत सोरेन हे शनिवारी रात्री अचानक दिल्लीला रवाना झाले होते. चार्टर्ड विमानाने ते पहाटे दिल्लीला पोहोचले. तेव्हापासून त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. तपास यंत्रणा चौकशीसाठी त्यांचा शोध घेत आहे. मात्र त्यांचे ठिकाण अद्याप कळू शकलेले नाही. 

टॅग्स :JharkhandझारखंडEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय