शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

काश्मीरी तरूणाशी लग्न करण्यासाठी पुण्याची तरूणी काश्मीरमध्ये, पोलिसांनी केली सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2018 11:23 IST

जम्मू-काश्मीर पोलिसांनी 25 जानेवारी रोजी मानवी बॉम्ब असलेल्या संशयातून अटक केलेल्या पुण्याच्या तरूणीची आता सुटका केली आहे.

श्रीनगर- जम्मू-काश्मीर पोलिसांनी 25 जानेवारी रोजी मानवी बॉम्ब असलेल्या संशयातून अटक केलेल्या पुण्याच्या तरूणीची आता सुटका केली आहे.  प्रजासत्ताक दिनी घातपाताचा कट रचल्याप्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी एका 18 वर्षीय तरूणीला अटक केली होती. पोलिसांनी तरूणीची 10 दिवस कसून चौकशी केली होती. पण या चौकशीमध्ये काहीही समोर न आल्याने तिची सुटका करण्यात आली.  18 वर्षीय तरूणीच्या चौकशीतून एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सोशल नेटवर्किंग साईटवर भेटलेल्या काश्मिरी तरुणाशी लग्न करण्यासाठी ती जम्मू-काश्मीरमध्ये आल्याचं पोलीस तपासातून समोर आलं आहे.  टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. 

पुण्यातील एक तरुणी प्रजासत्ताक दिनी जम्मू- काश्मीरमध्ये घातपात घडवण्यासाठी आली असल्याचं गुप्तचर यंत्रणांना सांगण्यात आलं होतं. यानंतर जम्मू -काश्मीर पोलिसांनी  २५ जानेवारी रोजी दक्षिण काश्मीरमधून तिला ताब्यात घेतलं होतं. पण पुण्यातील ही तरूणी कुठल्याही दहशतवादी संघटनेशी संबंधित नसल्याचं समोर आलं आहे. 

सुत्रांच्या माहितीनुसार, जम्मू-काश्मीर पोलिसांनी तरूणीची दहा दिवस चौकशी केली पण या चौकशीतून काहीही संशयास्पद आढळून आलं नाही. म्हणून तिची सुटका केल्याचं समजतं आहे.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरPoliceपोलिसPuneपुणे