“श्रीराम एक महापुरुष होते असे मी मानत नाही”; बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2021 02:24 PM2021-09-22T14:24:25+5:302021-09-22T14:24:40+5:30

बिहारच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. यानंतर वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, भाजपने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे.

jitan ram manjhi on lord ram and ramayan controversy bihar bjp leader replied | “श्रीराम एक महापुरुष होते असे मी मानत नाही”; बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

“श्रीराम एक महापुरुष होते असे मी मानत नाही”; बिहारच्या माजी मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य

Next

नवी दिल्ली: देशातील अनेक पक्षांचे नेते विविध मुद्द्यांवर आपली मते मांडत असतात. मात्र, ती मांडताना अनेकदा वादग्रस्त विधाने केली जातात. बिहारच्या एका माजी मुख्यमंत्र्यांनी असेच एक वक्तव्य केले आहे. यानंतर वादाला तोंड फुटण्याची शक्यता असून, भाजपने यावर तीव्र आक्षेप नोंदवला आहे. प्रभु श्रीराम हे एक महापुरुष होते असे मी मानत नाही, असे माजी मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. (jitan ram manjhi on lord ram and ramayan controversy bihar bjp leader replied)

मोठा दिलासा! PMC सह ‘या’ २१ बँकांच्या ठेवीदारांना मिळणार ५ लाखांची विमा भरपाई; पाहा, डिटेल्स

उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आधीच राजकीय वातावरण तापलेले असताना, त्यातच आता वादग्रस्त विधानांची भर पडताना दिसत आहे. मध्य प्रदेशमध्ये महाविद्यालयीन अभ्यासक्रमात रामचरितमानसचा समावेश करण्यावर प्रतिक्रिया देताना बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी हे विधान केले आहे. यानंतर भाजपकडूनही मांझी यांना प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

“आता मला सीमोल्लंघन करावंच लागेल”; मंदा म्हात्रेंनी दिला भाजपला थेट इशारा

श्रीराम एक महापुरुष होते असे मी मानत नाही

प्रभु श्रीराम एक महापुरुष होते असे मी मानत नाही. रामायण हे काल्पनिक आहे. त्यामुळे श्रीरामांचे जीवंत अस्तित्व मान्य करण्यासारखे नाही. मात्र, रामायणातील ज्या गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत, त्या कालातीत असून शिकण्यासारख्या आहेत, असे मांझी यांनी म्हटले आहे. तसेच रामायणाचा महाविद्यालयीन अभ्यासक्रमात समावेश करणे चांगली बाब आहे. त्यामुळे मुलांना चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील, असेही मांझी म्हणाले. भाजप प्रवक्ते प्रेम रंजन पटेल यांनी याला प्रत्युत्तर दिले असून, रामाचे अस्तित्व कोणीही नाकारू शकत नाही. अयोध्येत रामजन्मभूमीचे प्रमाण पुरातत्व खात्याला मिळाले आहेत. नासानेही रामसेतू मान्य केला आहे. रामाला काल्पनिक मानणाऱ्यांनी रामायणाचा अभ्यास करावा, असे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. 

Adani ग्रुपच्या मुंद्रा पोर्टवर ३००० किलो ड्रग्ज जप्त; सोशल मीडियावरील चर्चांनंतर दिले स्पष्टीकरण

दरम्यान, उच्च आणि वैद्यकीय शिक्षणातील अभ्यासक्रमात करण्यात आलेल्या बदलांबद्दल झालेल्या टीकेला बाजूस सारून सरकारने आता १६ व्या शतकात कवी तुलसीदास यांनी लिहिलेले महाकाव्य ‘रामचरितमानस’ विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मध्य प्रदेश सरकारने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख डॉ. केशवराव हेडगेवार आणि आणखी एक नेते दीनदयाळ उपाध्याय यांचे जीवन व कार्य राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांना शिकवण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता भगवान राम यांच्यावरील विषय कला शाखेच्या विद्यार्थ्यांना शिकवण्याची तयारी केली आहे. 
 

Web Title: jitan ram manjhi on lord ram and ramayan controversy bihar bjp leader replied

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.