शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईत मोहम्मद अली जिनांचा आलिशान बंगला; आता मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2025 15:27 IST

Jinnah House: पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी मुंबईतील मलबार हिल परिसरात 1936 साली स्वतःसाठी हा बंगला बांधला होता.

Jinnah House: पाकिस्तानचे संस्थापक मोहम्मद अली जिना यांनी मुंबईतील मलबार हिल परिसरात 1936 साली स्वतःसाठी 'साउथ कोर्ट' नावाचा एक आलिशान बंगला बांधला होता. भारताच्या विभाजनानंतर जिना पाकिस्तानात गेले अन् त्यांचा हा बंगला भारत सरकारच्या ताब्यात आला. आता सरकारने या बंगल्याबाबत एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. लवकरच या बंगल्याचे नूतनीकरण केले जाणार आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, या नुतणीकरणाच्या कामासाठी परराष्ट्र मंत्रालयाच्या (MEA) अंतिम मंजुरीची वाट पाहत आहे. टीओआयच्या वृत्तानुसार, परराष्ट्र मंत्रालयाला या बंगल्याला एक विशेष राजनैतिक एन्क्लेव्ह बनवायचे आहे.

मुंबई हेरिटेज कंझर्वेशन कमिटी (MHCC) ने ऑगस्ट 2023 मध्ये या हेरिटेज साइटच्या नूतनीकरणाला मान्यता दिली. परराष्ट्र मंत्रालयाने हे काम केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग (CPWD) कडे सोपवले असून, त्यांनी या प्रकल्पासाठी सर जेजे कॉलेज ऑफ आर्किटेक्चरला सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. 

मनोरंजक गोष्ट म्हणजे, मोहम्मद अली जिनांचे हे आर्ट डेको शैलीतील घर क्लॉड बॅटली यांनी डिझाइन केले होते. बॅटली त्यावेळी जेजे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये आर्किटेक्चर विभागाचे प्रमुख होते.

2018 साली परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवलेपंतप्रधान कार्यालयाने 2018 मध्ये 'जिना हाऊस' म्हणून प्रसिद्ध असलेला हा बंगला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद (ICCR) कडून परराष्ट्र मंत्रालयाकडे सोपवण्याचा निर्णय घेतला होता. 2017 मध्ये तत्कालीन परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी मलबार हिलचे आमदार मंगल प्रभात लोढा यांना एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी सांगितले होते की, परराष्ट्र मंत्रालय दिल्लीतील हैदराबाद हाऊसप्रमाणे या बंगल्याची दुरुस्ती आणि सजावट करेल.

जिना हाऊसमध्ये अनेक अंतर्गत बदल होणारमीडिया रिपोर्ट्सनुसार, मुंबई हेरिटेज कन्झर्वेशन कमिटी (MHCC) कडे सादर केलेल्या प्रस्तावात जिना हाऊस बंगल्याचे निवासी जागेतून कार्यालयात रूपांतर केले जाईल आणि त्यामध्ये आवश्यक दुरुस्ती, बदल केले जातील. कागदपत्रांनुसार, परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) अद्याप बंगल्याच्या कोणत्याही भागात कोणतेही बदल केलेले नाहीत किंवा पुढील बांधकाम करण्याची विनंती केलेली नाही. परंतु असे म्हटले जाते की भारताची ओळख, इतिहास आणि संस्कृती दर्शविण्यासाठी आत काही सौंदर्यात्मक बदल केले जाऊ शकतात.

 

टॅग्स :MumbaiमुंबईPakistanपाकिस्तानIndiaभारतBJPभाजपाCentral Governmentकेंद्र सरकार