शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंच्या तक्रारीनंतर अमित शाहांकडून रवींद्र चव्हाणांची पाठराखण; "पक्षबांधणी सुरूच ठेवा..."
2
इंग्रज ढासळले...! ब्रिटिश इंडियन्स, उद्योजक ब्रिटन सोडू लागले! अब्जाधीश हरमन नरुला दुबईला स्थायिक होणार
3
“मनसेचा आघाडीचा प्रस्ताव नाही, आम्हाला महाराष्ट्र धर्म शिकवू नये”; काँग्रेस नेत्यांचे उत्तर
4
निवडणूक न लढताच 'जीन्स-शर्ट'मधील तरुणाने घेतली मंत्रिपदाची शपथ! कोण आहेत दीपक प्रकाश?
5
IIT दिल्लीमध्ये देशातील पहिल्या ‘Gen-Z पोस्ट ऑफिस’ची सुरुवात; Wifi, QR द्वारे पार्सल बुकिंग
6
"आता मैदान मोकळं, बघू कोण येतंय!"; संरक्षणातील पोलिसांना परत पाठवत जरांगेंचे आव्हान
7
Tesla Model Y सेफ्टी टेस्टमध्ये 'Pass' की 'Fail'? 5-स्टार रेटिंगमध्ये किती पॉइंट्स मिळाले? जाणून घ्या
8
“बिहारने जंगलराज नाकारून विकासाला मत दिले”; शिंदेंनी केले PM मोदी-नितीश कुमारांचे अभिनंदन
9
Metaचे मोठे पाऊल! WhatsApp मध्ये लवकरच येणार 'हे' जबरदस्त फीचर; वारंवार लॉग-इन करण्याची कटकट संपणार
10
मुलांच्या भविष्यासाठी सोने की SIP? 'या' दोन्ही पर्यायांचे फायदे-तोटे समजून घ्या आणि योग्य गुंतवणूक निवडा!
11
...त्यामुळे सर्व छोट्या मोठ्या कुरुबरी अमित शाह यांना जाऊन सांगितल्या जातात; काँग्रेसचा टोला
12
जम्मूमध्ये 'काश्मीर टाईम्स'च्या कार्यालयावर SIA चा मोठा छापा; AK-47 च्या गोळ्या आणि ग्रेनेडचा लिव्हर जप्त!
13
बाजारात तेजीचा डबल धमका! निफ्टी वर्षभरानंतर २६,२०० पार, गुंतवणूकदारांची ६८,००० कोटींची कमाई
14
Red Fort Blast: दिल्लीतील स्फोट प्रकरणात आणखी चार प्रमुख आरोपींना अटक, एनआयएची मोठी कारवाई
15
सप्तपदी झाले, डीजेवर नाचली, पाठवणीच्या वेळी पसार, नवरदेव म्हणतो, "जमीन गहाण ठेवून लग्न..."
16
दिल्ली दंगल सूनियोजित कट होता; उमर खालिद-शरजील इमामच्या जामिनास पोलिसांचा विरोध
17
अ‍ॅसिड हल्ल्यातील 'ममता'चा अखेर मृत्यू; फेसबुकवर वेदना मांडणाऱ्या आईची दोन मुले झाली पोरकी
18
नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरले, मोठा गोंधळ सुरू; कर्फ्यू लागू
19
EVM मध्ये ३६ मतांची आघाडी, पण ३६० पोस्टल मते बाद झाली आणि पारडे फिरले, बिहारमधील अजब निकाल चर्चेत
20
Supreme Court: संसद न्यायालयीन निर्णयावर कुरघोडी करू शकत नाही; लवाद सुधारणा कायद्याच्या तरतुदी सुप्रीम कोर्टाकडून रद्द
Daily Top 2Weekly Top 5

जिहादी अजेंडा चालवणारे सेक्युलॅरिझमच्या कातडीखाली लपतात, सरपंचांच्या हत्येवरून कंगनाचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2020 23:34 IST

दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित व्यक्तीची हत्या केल्याने काश्मिरी पंडितांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

 नवी दिल्ली - काश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांनी केलेल्या काश्मिरी पंडित सरपंच अजय पंडिता यांच्या हत्येनंतर काश्मीरमधील वातावरण तापले आहे. तसेच दहशतवाद्यांनी काश्मिरी पंडित व्यक्तीची हत्या केल्याने काश्मिरी पंडितांचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, रोखठोक मत मांडण्यासाठी प्रसिद्ध असलेल्या कंगना राणौत हिनेही या प्रकरणात प्रतिक्रिया देताना अजय पंडिता यांच्या हत्येबाबत नाराजी व्यक्त केली आहे. 

कंगनाने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करून बॉलिवूडवरसुद्धा जोरदार टीका केली आहे. काश्मिरी पंडित असलेल्या अजय पंडिता यांच्या हत्येबाबत बॉलीवूडने पाळलेल्या मौनावर कंगनाने प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. सेक्युलँरिझमचे धडे शिकवणारे आता गप्प बसले आहेत, असे सांगत कंगनाने बॉलिवूडच्या सिलेक्टिव्ह भूमिकेवर ताशेरे ओढले आहेत. काही अभिनेते मेणबत्त्या आणि पेट्रोल बॉम्ब घेऊन देशाला जाळण्यासाठी रस्त्यावर उतरतात. मात्र अशा.मुद्द्यावर मौन पाळतात. 

दरम्यान, काश्मिरी पंडितांना पुन्हा एकदा काश्मीर खोऱ्यात परतता आले पाहिजे, त्यांना त्यांची भूमी पुन्हा मिळाली पाहिजे.  तसेच काश्मीर खोऱ्यात पुन्हा हिंदू धर्माची स्थापना झाली पाहिजे, अशी मागणी कंगनाने पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे केली आहे. 

दरम्यान, माझे वडील आयुष्यात कुणाला घाबरले नाहीत. ना मी कुणाला घाबरते, अशा शब्दात अजय पंडिता यांच्या मुलीने दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. तसेच तिने शासन आणि प्रशासनाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. एका वृत्तवाहिनीशी संवाद साधताना अजय पंडिता यांची कन्या शीन पंडिता म्हणाली की, 'माझ्या वडिलांनी संरक्षण मागितले होते. काश्मीरसारख्या प्रदेशात  सरपंच बनल्यानंतर त्यांना संरक्षण मिळणे आवश्यक होते. मात्र जी गोष्ट त्यांना मिळणायला हवी होती ती त्यांना मागावी लागली. मात्र तरीही त्यांना संरक्षण मिळाले नाही, अशा शब्दांत तिने स्थानिक शासन, प्रशासन यंत्रणेबाबत संताप व्यक्त केला. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerrorismदहशतवादKangana Ranautकंगना राणौत