जिग्नेश शहाला ईडीकडून अटक
By Admin | Updated: July 12, 2016 23:21 IST2016-07-12T23:14:41+5:302016-07-12T23:21:40+5:30
नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमधील कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणी उद्योगपती जिग्नेश शाह याला सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी अटक केली आहे.

जिग्नेश शहाला ईडीकडून अटक
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १२ - नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमधील कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणी उद्योगपती जिग्नेश शाह याला सक्तवसुली संचालनालयाने मंगळवारी अटक केली आहे.
नॅशनल स्पॉट एक्स्चेंज लिमिटेडमधील कोट्यवधींच्या गैरव्यवहार प्रकरणी उद्योगपती जिग्नेश शाह याला अटक करण्यात आली असून याप्रकरणी उद्या त्याला पीएमएलए कोर्टात हजर करण्यात येणार आहे, अशी माहिती सक्तवसुली संचालनालयाच्या एका अधिका-याने दिली.
तसेच, जिग्नेश शाहच्या विरोधात काही पुरावे आमच्या हाती लागले असून त्याला कोर्टात हजर केल्यानंतर त्याच्या पोलीस कोठडी मागणी करणार असल्याचेही या अधिका-यांने सांगितले.