शहरं
Join us  
Trending Stories
1
“भारत कधीही दहशतवादासमोर झुकणार नाही”; पहलगाम वर्षपूर्तीला PM मोदींचा शत्रूंना स्पष्ट संदेश
2
Top Marathi News LIVE Updates: युद्धविरामावरूनच वाक्-युद्ध! अमेरिकेच्या अटी इराणला अमान्य
3
शांतता चर्चेसाठी प्रयत्न, मुनीर यांचा ट्रम्प यांना फोन; म्हणाले, “होर्मुझची नाकेबंदी...”
4
"हजारोंसे भारी... एक नारी!" रोहित पवारांकडून 'त्या' रणरागिणीचं कौतुक; पोलिसांच्या कारवाईवरून सरकारला ठणकावलं
5
हर हर महादेव... केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले, मंत्रोच्चाराने दुमदुमला परिसर, भक्तांची रीघ
6
BEST: ‘बेस्ट’कडून ५०० मिडी बसची खरेदी, समितीची मंजुरी; सरकारकडे प्रस्ताव
7
"त्या जागेने माझं सर्वस्व हिरावलं, योगींची भेट..."; दहशतवादी हल्ल्यात पती गमावलेल्या ऐशान्याची व्यथा
8
महिनाभरातच नेपाळमधील बालेन शाह सरकारविरोधात जनआक्रोष, ‘या’ दोन मुद्द्यांवरून नाराजी
9
कार्ड बदललं तरी ऑटोमॅटिक पेमेंट थांबणार नाही; ₹१५,००० पर्यंत OTP-पासवर्डची गरजही भासणार नाही
10
Leopard Attack: कसारा-कळभोंडेत बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
11
मन रानात गेलं गं! अश्विनी भावे यांचा शेतात मनसोक्त फेरफटका; सोशल मीडियावर दाखवली झलक
12
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
13
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार विक्री; सेन्सेक्स ५०० अंकांनी तर निफ्टी २४,४५० च्या खाली, IT इंडेक्समध्ये मोठी घसरण
14
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
15
Mumbai Local: दुहेरी ब्लॉकने मुंबईकर त्रस्त; नोकरदारांना सलग दुसऱ्या दिवशी ‘लेटमार्क’चा फटका 
16
गुरुपुष्यामृत योग २०२६: नशीब पालटणारा सुवर्ण मुहूर्त! २३ एप्रिल, गुरुपुष्यामृत योग 'या' राशींसाठी ठरणार खास!
17
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
18
CSMT: सीएसएमटीवर मोठा अनर्थ टळला! चुकीच्या सिग्नलमुळे दोन लोकल एकाच ट्रॅकवर; नेमकं काय घडलं?
19
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
20
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडांना जामीन

By admin | Updated: February 18, 2015 23:54 IST

कोळसा घोटाळा: सीबीआयने केला होता विरोध

कोळसा घोटाळा: सीबीआयने केला होता विरोध
नवी दिल्ली- कोळसा खाणपट्टे वाटप घोटाळाप्रकरणी येथील विशेष सीबीआय न्यायालयाने झारखंडचे माजी मुख्यमंत्री मधु कोडा आणि इतर सातजणांना बुधवारी जामीन मंजूर केला. यात माजी कोळसा सचिव एच.सी. गुप्ता आणि झारखंडचे माजी मुख्य सचिव अशोककुमार बसु यांचाही समावेश आहे.
मी या सातही जणांचा जामीन अर्ज मंजूर करीत असल्याचे विशेष सीबीआय न्यायाधीश भरत पाराशर यांनी सांगितले. एक लाख रुपयांचा जातमुचलका आणि तेवढ्याच रक्कमेच्या हमीवर या आठजणांची मुक्तता झाली आहे. याप्रकरणाची पुढील सुनावणी आता ४ मार्चला होईल.
तत्पूर्वी केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) आरोपींच्या जामीन याचिकेला विरोध करताना या लोकांनी कोळसा खाणपट्टे वाटपात विनी आयरन ॲण्ड स्टील उद्योग लिमिटेड या कंपनीला फायदा मिळवून देण्यासाठी स्वत:च्या पदाचा गैरवापर केला आणि कारस्थान रचले असा आरोप येथील विशेष न्यायालयात केला होता.
आरोपी राजकीय नेते आणि प्रशासकीय अधिकारी असल्याने ते साक्षीदारांवर दबाव आणू शकतात, अशीही भीती तपास संस्थेतर्फे व्यक्त करण्यात आली होती.
ज्येष्ठ सरकारी वकील व्ही.के. शर्मा यांनी यासंदर्भात न्यायालयाला सांगितले की, सरकारी पक्षाचा दावा हा मौखिक साक्षीदारांवर आधारलेला आहे. शिवाय यात गुंतलेले लोकसेवक आणि राजकारणी हे अत्यंत प्रभावशाली आहेत. त्यांना लवकर अटक झाली नाही यावरूनच हे स्पष्ट होते.
गुप्ता यांनी तपास समितीच्या शिफारशींबाबत पंतप्रधान कार्यालयाची दिशाभूल केली होती. आणि त्यावेळी गुप्ता हेच या समितीचे अध्यक्ष होते, याकडेही शर्मा यांनी न्यायालयाचे लक्ष वेधले.
तर कोडा आणि इतर सात जणांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडणाऱ्या वकिलांनी आपले अशिल तपासात संपूर्ण सहकार्य करीत असल्याने त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठविण्याची गरज नाही,असा युक्तिवाद केला होता.
कोडा यांच्याशिवाय बसु, गुप्ता, बिपिन बिहारी सिंग, बसंतकुमार भट्टाचार्य, कोलकाता येथील विनी आयरन ॲण्ड स्टील उद्योग लिमिटेडचे संचालक वैभव तुस्थान, चार्टर्ड अकाईंटंट नवीनकुमार तुलस्यान आणि कोडांचे घनिष्ट सहकारी विजय जोशी न्यायालयात हजर झाले होते. या सर्वांविरुद्ध समन्स जारी करण्यात आला होता.
झारखंडमधील राजहरा नॉर्थ कोळसा खाणपट्ट्याचे उपरोक्त कंपनीला वाटप करताना झालेल्या आर्थिक गैरव्यवहाराशी संबंधित हे प्रकरण आहे.
(वृत्तसंस्था)