झारखंड विकास मोर्चा भाजपामध्ये विलीन होणार ?
By Admin | Updated: December 23, 2014 18:05 IST2014-12-23T17:44:55+5:302014-12-23T18:05:51+5:30
झारखंड विकास मोर्चाने भाजपामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त असून लवकरच या संदर्भात घोषणा केली जाईल असे समजते.

झारखंड विकास मोर्चा भाजपामध्ये विलीन होणार ?
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २३ - झारखंडमध्ये काठावर बहुमत मिळवणा-या भाजपाला आता मोठा दिलासा मिळाला आहे. झारखंड विकास मोर्चाने भाजपामध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त असून लवकरच या संदर्भात घोषणा केली जाईल असे समजते. झाविमो भाजपामध्ये विलीन झाल्यास झारखंडमधील भाजपाचे संख्याबळ ४८ पर्यंत पोहोचणार आहे.
८१ जागा असलेल्या झारखंडमध्ये सत्तास्थापनेसाठी ४१ आमदारांचे पाठबळ असणे गरजेचे आहे. भाजपाने आता ४१ जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. मात्र अद्याप अंतिम निकाल जाहीर व्हायचा आहे. यामध्ये भाजपाने एखादी जागा गमावली तर भाजपा बहुमतापासून केवळ एका मताने दूर जाईल. यादृष्टीने भाजपाने सत्तास्थापनेसाठी आत्तापासूनच तयारी केल्याचे समजते. बाबूलाल मरांडी यांचा झारखंड विकास मोर्चा भाजपामध्ये विलीन होणार असल्याचे वृत्त आहे. झाविमोचे ७ आमदार विजयी झाले असून विलीनीकरण झाल्यास भाजपाचे झारखंडमधील संख्याबळ ४८ पर्यंत झाले आहे.