शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Ropeway Accident: 20 तासांपासून हवेत लटकतायत 48 लोक, बचावकार्यात लष्करालाही येत आहेत अडचणी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2022 12:28 IST

रामनवमीनिमित्त रविवारी शेकडो पर्यटक येथे पूजेसाठी आले होते. याच दरम्यान रोपवेची एक ट्रॉली वरून खाली येत असताना, खालून वर जाणाऱ्या एका ट्रॉलीला धडकली.

झारखंडमधील सर्वात उंच असलेल्या, त्रिकूट रोपवेवर झालेल्या अपघातात अद्याप 48 जण हवेतच अडकलेले आहेत. या रोपवेवर रविवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास ट्रॉलिज एकमेकांवर धडकल्या होत्या. यामुळे लोक पहाडावरच अडकले आहेत. एनडीआरएफ रात्री उशिरा बचाव कार्याला सुरुवात केली आहे. यानंतर लष्करालाही मदतीसाठी पाचारण करण्यात आले. मात्र, अद्याप लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढता आलेले नाही.

रामनवमीनिमित्त रविवारी शेकडो पर्यटक येथे पूजेसाठी आणि फिरण्यासाठी आले होते. याच दरम्यान रोपवेची एक ट्रॉली वरून खाली येत असताना, खालून वर जाणाऱ्या एका ट्रॉलीला धडकली. या अपघातात ट्रॉलीमधील लोक जखमी झाले आहेत. हा अपघात झाला तेव्हा जवळपास दोन डझन ट्रॉलीज हवेतच होत्या. यानतंर घाईघाईने अनेकांना सुरक्षितपणे काढण्यात आले. तसेच, या अपघातात एकाचा मृत्यू झाल्याचेही बोलले जात आहे.हा अपघात होऊन साधारणपणे 20-22 तास झाले आहेत. मात्र, अद्यापही 48 जण हवेत अडकलेले आहेत. हे लोक एकूण 18 ट्रॉलीजमध्ये बसलेले आहेत. या लोकांचा बचाव करण्यासाठी लष्कराचे हेलिकॉप्टर जसे त्यांच्याजवळ पोहोचत आहे, तसे हेलिकॉप्टरच्या पंख्याच्या हवेमुळे ट्रॉलीज हेलकावे खात आहेत. यामुळे त्यात बसलेल्या लोकांच्या जीवालाही धोका निर्माण होत आहे.

ड्रोनच्या माध्यमानं पोहोचवलं जातंय अन्न-पाणी -रोपवेमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, अथक प्रयत्नांनंतरही बचाव पथकाला अद्याप यश आलेले नाही. या अडकलेल्या लोकांपर्यंत ड्रोनच्या माध्यमाने अन्न-पाणी पोहोचवले जात आहे. ट्रॉलींमध्ये लहान मुले, महिला, पुरुष आदींचा  समावेश आहे.

यासंदर्भात बोलताना जिल्हाधिकारी मंजुनाथ भाईजंत्री म्हणाले, 'सध्या रोपवे बंद आहे, ट्रॉली डिस्प्लेस झाल्याने हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ट्रॉलीमध्ये अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. यासाठी एनडीआरएफसह लष्कराचीही मदत घेण्यात येत आहे. यासंदर्भात कुठल्याही अफवेकडे लक्ष देऊ नये. 

टॅग्स :JharkhandझारखंडAccidentअपघातIndian Armyभारतीय जवान