शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! मोफत ऑपरेशनच्या नावाखाली वृद्धाचा डोळा काढला अन् काचेची गोटी बसवली

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2022 18:53 IST

राज्याचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी याप्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

झारखंडमध्येडॉक्टरांच्या हलगर्जीपणाचे अत्यंत गंभीर प्रकरण समोर आले आहे. वृद्धांची दृष्टी सुधारण्याच्या नावाखाली डॉक्टरांनी ऑपरेशन करून वृद्धाचा खरा डोळा काढला आणि काचेचा डोळा बसवल्याचा प्रकार घडला आहे. ऑपरेशननंतर काही दिवसांनी वृद्धाचे डोळे उघडले, तेव्हा त्याला काहीच दिसत नव्हते. ही बाब उघडकीस येताच वृद्धाचे ऑपरेशन करणारी महिला अंगणवाडी सेविका फरार झाली आहे. झारखंडचे आरोग्य मंत्री बन्ना गुप्ता यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण घाटशिला येथील उत्तर मौभंदर पंचायतीच्या किटाडीह गावचे आहे. गावातील रहिवासी गंगाधर सिंग (70) यांच्यासह एकूण आठ जणांना 18 नोव्हेंबर 2021 रोजी KCC नेत्र रूग्णालय जमशेदपूर येथे नेत्र शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. गावातील महिला अंगणवाडी सेविका सोमावारी माली हिनेच त्या सर्वांना रुग्णालयात नेले होते. ऑपरेशननंतर गंगाधर सिंग घरी परतले, पण त्यांचा उजवा डोळा दुखू लागला. दुखण्याच्या तक्रारीनंतर कुटुंबीयांनी रुग्णालयाशी संपर्क साधला. त्यानंतर गंगाधर सिंग यांच्यावर दोन महिने कुटुंबाविना रुग्णालयात उपचार केला.

डोळ्यात गोटी बसवली झाडलीदोन महिन्यानंतर गंगाधर सिंह पुन्हा घरी आले. गंगाधर सिंह यांच्या उजव्या डोळ्यात अचानक खाज येऊ लागली, म्हणून त्यांनी डोळा चोळला. डोळा चोळताना काचेची गोटी बाहेर आली. यानंतर गंगाधर सिंह घाटशीला येथील उपविभागीय रुग्णालयात तपासणीसाठी पोहोचले असता डोळा काढल्याचे समोर आले. ही बाब मीडियाच्या निदर्शनास आल्यानंतर ती हेडलाईन्स बनली. डोळ्यांच्या ऑपरेशनच्या नावाखाली डोळा काढल्याप्रकरणी गंगाधर यांनी स्थानिक पोलीस ठाण्यात तक्रार केली.

आरोग्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिलेहे प्रकरण गांभीर्याने घेत राज्याचे आरोग्यमंत्री बन्ना गुप्ता यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. मंत्री बन्ना गुप्ता म्हणाले की, हे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. रुग्णालयाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. भविष्यात, ज्या रुग्णालयाचा सहभाग समोर येईल, त्या रुग्णालयाचा परवाना झारखंड क्लिनिक आस्थापना कायद्यांतर्गत रद्द केला जाईल आणि कायदेशीर कारवाई केली जाईल.

टॅग्स :Jharkhandझारखंडdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी