शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जन्मापासून तोंड 'शिवलेले', 20 वर्षांपासून धान्याचा एक कणही खाल्ला नाही; असा राहिला जिवंत...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2023 13:51 IST

झारखंडमधील एका तरुणाचे जन्मापासून तोंड बंद होते, डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करुन त्याला नवजीवन दिले.

झारखंडमधील दुमका येथून एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. येथील एका 20 वर्षीय तरुणाला जन्मापासूनच आपले तोंड उघडता येत नव्हते. मात्र डॉक्टरांनी आता या तरुणावर शस्त्रक्रिया करुन त्याला नवजीवन दिले आहे. विशेष म्हणजे, जन्मापासूनच त्याला अन्नाचा एक कणही खाता येत नव्हता, पण आता तो आरामात अन्न खाऊ शकतो.

शीतपेयांवर जगत होता20 वर्षीय रहम-उल-अन्सारी जन्मापासूनच टेम्पोरोमॅन्डिब्युलर जॉइंट अॅन्किलोसिस  (Temporomandibular Joint Ankylosis) या गंभीर आजाराने ग्रस्त होता. या आजारामुळे तो जन्मापासून आजतागायत तोंड उघडू शकत नव्हता. तोंड पूर्णपणे बंद असल्यामुळे फक्त शीतपेयांवर जगत होता. आत्तापर्यंत रहम-उल-अन्सारीने धान्याचा एक दाणाही खाल्ला नव्हता.

20 वर्षानंतर तोंड उघडलेकेवळ खाण्यातच नाही तर बोलण्यातही रुग्णाला खूप अडचणी येत होत्या. तसेच, रहिम-उलचा चेहराही खूप विद्रूप दिसत होता. रुग्णाचे नातेवाईक उपचारासाठी अनेक दिवस दवाखान्यात येत राहिले, मात्र आजाराचे गांभीर्य आणि शस्त्रक्रियेतील गुंतागुंतीमुळे रुग्णावर उपचार होऊ शकले नाहीत. दुसरीकडे, हेल्थ पॉइंट हॉस्पिटलमध्ये गुरुवारी रहीम-उलची शस्त्रक्रिया करण्यात आली, त्यानंतर रुग्णाला 20 वर्षांनंतर तोंड उघडता आले.

कवटीच्या हाडापासून अलग केला जबडाया प्रकरणात रहीम-उलची शस्त्रक्रिया करणारे डॉ. अनुज यांनी सांगितले की, फक्त टेम्पोरोमँडिब्युलर जॉइंट अॅन्किलोसिसची शस्त्रक्रियाच गुंतागुंतीची नाही, तर अशावेळी तोंड बंद पडल्यामुळे भूल देणेही खूप अवघड काम असते. अँकिलोसिसमुळे रुग्णाचा खालचा जबडा त्याच्या कवटीच्या दोन्ही बाजूंच्या हाडांशी पूर्णपणे जोडला गेला होता. सुमारे 5 तास चाललेल्या या ऑपरेशनमध्ये खालचा जबडा दोन्ही बाजूंच्या कवटीच्या हाडापासून वेगळा करण्यात आला आणि त्यानंतर चेहऱ्याची विकृतीही दुरुस्त करण्यात आली. 

टॅग्स :JharkhandझारखंडJara hatkeजरा हटकेdoctorडॉक्टर