शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

IAS Pooja Singhal Husband Abhishek Jha Story : घटस्फोटाआधीच अभिषेकसोबत सूत जुळले; घबाडवाल्या आयएएस पूजा सिंघलची लव्हस्टोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2022 08:34 IST

IAS Pooja Singhal Husband Abhishek Jha Story : सध्या पूजा सिंघल हे नाव चर्चेत असून दुसऱ्या दिवशी ईडीनं केलेल्या कारवाईत १५० कोटींच्या बेहिशेबी संपत्तीचे दस्तावेज सापडले आहेत.

IAS Pooja Singhal Husband Abhishek Jha Story : भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या आयएएस अधिकारी व झारखंडमधील खनन व उद्योग विभागाच्या सचिव पूजा सिंघल यांच्यावर मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीची छापेमारी दुसऱ्या दिवशीही सुरूच होती. यात १५० कोटींच्या बेहिशेबी संपत्तीचे दस्तावेज मिळाले. झारखंड, बिहारसह देशाच्या अनेक राज्यांत दुसऱ्या दिवशीही छापे टाकण्यात आले. दरम्यान, आता अभिषेक आणि पूजा यांनी लव्हस्टोरी गुगलवर सर्वाधिक सर्च केली जात आहे.

ऑस्ट्रेलियातून एमबीएची पदवी घेऊन परतलेल्या अभिषेक झा आणि पूजा सिंघल यांच्यातील मैत्री आणि लग्नाबाबत सोशल मीडियावर विविध प्रकारच्या चर्चा सुरू आहेत. यावरून त्या दोघांची मैत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून झाल्याचं दिसून येत आहे. तसंच नंतर एका जीममध्ये असल्यानं दोघांमध्ये मैत्रीही झाली.

आयएएस राहुल पुरवार यांच्याशी पहिलं लग्नदरम्यान, यापूर्वी पूजा सिंघल यांनी आपले सीनिअर असलेल्या आयएएस राहुल पुरवार यांच्या विवाह केला होता. परंतु त्यांच्यातील नातं फार काळ टिकलं नाही. सुरूवातीच्या दोन तीन वर्षांमध्ये त्यांच्या काही कारणांवरून मतभेद झाले. त्यानंतर त्या दोघांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला. परंतु घटस्फोटापूर्वीच पूजा आणि अभिषेक यांच्यातील मैत्री अधिक घट्ट होत गेल्याच्याही चर्चा आहेत. यानंतर दोन्ही कुटुंबीयांच्या मदतीनं त्यांनी विवाह केला. यानंतर काही काळातच त्यांच्या घरावर ईडीचे छापे पडले.

मोठं घबाडपूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांचे सीए सुमन कुमार यांना ताब्यात घेतले आहे. आजवर १९.३१ कोटींची रोकड जप्त केली आहे. खुंटीच्या मनरेगा घोटाळ्यात ईडी त्यांच्यावर एवढी मोठी कारवाई करील, याबाबत कोणालाही कल्पना नव्हती. ईडीने आता सीबीआयला पत्र लिहिले असून, गुन्हा दाखल करण्यास सांगितलं आहे. त्यानुसार सीबीआय गुन्हा दाखल करू शकतो. पूजा सिंघल खुंटी व चतरामधील मनरेगा घोटाळ्यातही अडकलेल्या आहेत.

पतीच्याहॉस्पिटलवरईडीचीनजर पूजा सिंघल यांचे पती अभिषेक झा यांच्या पल्स रुग्णालयावरही ईडीची नजर आहे. यामार्फत मनी लाँड्रिंग केल्याचा संशय आहे. मनी लाँड्रिंगसाठी मेधांश हॉस्पिटल प्रा. लि. ची स्थापना करण्यात आली. त्यानंतर पल्स संजीवनी हेल्थ केअर प्रा. लि. नावाने कंपनी बनवून तिचे एकत्रीकरण केले. पल्स संजीवनी हेल्थ केअर प्रा. लि.मध्ये अभिषेक झा हे एम. डी. आहेत. पूजा यांचे बंधू सिद्धार्थ सिंघल, अभिषेक झा यांची बहीण अमिता झा व दीप्ती बॅनर्जी हेही संचालक आहेत. याच पत्त्यावर मेधांश हॉस्पिटल प्रा. लि. आहे. या दोन्हींचे २०१६ मध्ये एकत्रीकरण झाले. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयgoogleगुगल