शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली महिला आयोगातून २२३ कर्मचाऱ्यांना तडकाफडकी काढले; उपराज्यपालांचे आदेश
2
माढा, सोलापूरात महाविकास आघाडीला धक्का; देवेंद्र फडणवीसांच्या खेळीनं भाजपाला फायदा
3
'अस्वस्थ झाला असतात तर ८४ वर्ष जगला नसता';नारायण राणेंचं शरद पवारांना प्रत्युत्तर
4
मतदानाच्या टक्केवारीत अचानक ११ दिवसांनी वाढ कशी?; संजय राऊतांनी व्यक्त केली शंका
5
कोरोना लसीकरण सर्टिफिकेटवरून PM नरेंद्र मोदींचा फोटो गायब? तांत्रिक बिघाड की आणखी काही कारण...
6
अखिलेश यादव यांचा समाजवाद की परिवारवाद? कुटुंबातील एवढे सदस्य लोकसभेच्या रिंगणात 
7
Fact Check : "मोदी जिंकले तर आरक्षण संपुष्टात येईल"; 'ती' क्लिप खोट्या दाव्यासह व्हायरल, जाणून घ्या 'सत्य'
8
'माझा भाऊ नाराज नाही', किरण सामंतांनी फोटो, बॅनर हटविल्यावरून उदय सामंतांची प्रतिक्रिया
9
विराट-अनुष्काचा मुलगा 'अकाय' कसा दिसतो? टीव्ही अभिनेता आमिर अली म्हणाला...
10
टेक कंपन्यांत मंदीचे वारे! एप्रिलमध्ये ७०००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढले; गुगल, टेस्ला ही यादीत
11
"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
12
बलात्कार पीडितेला मदत करणाऱ्या शिक्षकाचं हादरवणारं कृत्य; पोलिसांनी ठोकल्या बेड्या
13
दक्षिण भारतातील सर्वात तरुण उमेदवार! जाणून घ्या कोण आहेत मोहित रेड्डी? 
14
राष्ट्रीय पुरस्कार मिळालेल्या सिनेमामुळे प्रसाद झाला होता कर्जबाजारी; विकावं लागलं घर; म्हणाला, 'कर्जाचे हप्ते, बँकेचे फोन..';
15
अमित शाहांच्या बनावट व्हिडिओ प्रकरणी पोलीस ॲक्शन मोडवर, 3 बड्या नेत्यांना पाठवली नोटीस 
16
‘मोदी, भाजपा २७२ किंवा ३०० पार का म्हणत नाही? ४०० पार म्हणजे…’ संभाजीराजेंनी सांगितला संभाव्य धोका
17
Godrej Inside Story : कुलूप आणि चावीनं सुरुवात, मग इंग्रजांसाठी बनवली तिजोरी; गोदरेजचा यशाच्या शिखरापर्यंतचा रंजक प्रवास
18
हिट अँड रन: सुरेश रैनावर दु:खाचा डोंगर, कारने स्कूटीला धडक दिल्याने अपघात, मामेभावाचा मृत्यू   
19
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; BPCL मध्ये तेजी, Kotal Bank घसरला
20
भेटायला गेले अन् पक्षप्रवेश करून घेतला; सकाळी शिंदे गटात, संध्याकाळी ठाकरे गटात

चारा घोटाळ्याप्रकरणी लालूप्रसाद यादव यांना मिळाला जामीन, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2019 4:03 PM

बऱ्याच काळापासून कारागृहात असलेल्या लालूप्रसाद यादव यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

रांची - चारा घोटाळ्या प्रकरणी सध्या कारावासाची शिक्षा भोगत असलेले राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना रांची उच्च न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. त्यामुळे बऱ्याच काळापासून कारागृहात असलेल्या लालूप्रसाद यादव यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र अन्य दोन प्रकरणात शिक्षा झालेली असल्याने त्यांनी सध्यातरी तुरुंगातच राहावे लागणार आहे.  देवघर कोषागार प्रकऱणात शिक्षेचा अर्ध्याहून अधिक अवधी पूर्ण झाल्याचा आधार घेऊन लालूप्रसाद यादव यांनी जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. त्यावर सुनावणी करताना रांची उच्च न्यायालयाने प्रत्येकी 50 हजार रुपयांच्या हमीवर त्यांचा जामीन मंजुर केला. मात्र लालूप्रसाद यादव यांनी आपला पारपोर्ट न्यायालयात जमा करावा, असे आदेशही कोर्टाने दिले आहेत.  चारा घोटाळ्या प्रकरणी याआधी 5 जुलै रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी रांची उच्च न्यायालयाने लालूप्रसाद यादव यांना दिलासा दिला नव्हता. तसेच लालूप्रसाद यादव यांनी दाखल केलेल्या जामीन अर्जावर सुनावणी करण्यासाठी हायकोर्टाने 12 जुलै ही तारीख निश्चित केली होती. सध्या लालू प्रसाद यादव हे रांचीमधील कारागृहात कारावासाची शिक्षा भोगत आहेत.  यावर्षी 29 मे रोजी रांचीमधील विशेष न्यायालयाने कोट्यवधी रुपयांच्या चारा घोटाळा प्रकरणी 16 आरोपींना दोषी ठरवले होते. तसेच त्यांना तीन-ते चार वर्षांची शिक्षा सुनावली होती. एस. एन. मिश्रा यांच्या विशेष न्यायालयाने चाईबासा येथील कोषागारातून घोटाळा करून 37 कोटी रुपये काढल्याप्रकरणी  16 जणांना दोषी ठरवले होते. त्यापैकी 11 जणांना तीन वर्षे तर अन्य पाच जणांना चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.  

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवCourtन्यायालयBiharबिहार