शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

...अन् अमित शहांची मुख्यमंत्र्यांबद्दलची 'ती' भीती खरी ठरली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2019 13:00 IST

महाराष्ट्रापाठोपाठ झारखंडमध्येही भाजपाला धक्का

रांची: झारखंडमध्ये पराभव पत्करावा लागल्यानं हिंदी पट्ट्यातलं आणखी एक महत्त्वाचं राज्य भाजपाच्या हातातून निसटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहांनी झारखंडमधील सत्ता कायम राखण्यासाठी संपूर्ण ताकद पणाला लावली होती. मात्र झारखंडच्या मतदारांनी झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल यांच्या महाआघाडीच्या बाजूनं कौल देत भाजपाला जोरदार धक्का दिला. या पराभवामुळे अमित शहांनी वर्तवलेली शक्यता खरी ठरली आहे. आज तक या हिंदी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात काही दिवसांपूर्वी बोलताना अमित शहांनी राज्यांमधील भाजपा नेतृत्त्वांवर भाष्य केलं होतं. 'जातीच्या आधारावर आम्ही नेतृत्त्वाची निवड करत नाही. आमच्या पक्षाला यामुळे नुकसानदेखील सहन करावं लागतं. मात्र जातीच्या निकषावर आम्ही कधीही अशा प्रकारचे निर्णय घेत नाही,' असं शहा म्हणाले होते. त्यांच्या विधानाला झारखंडसोबतच महाराष्ट्र, हरयाणातील मुख्यमंत्र्यांचा संदर्भ होता. आदिवासीबहुल झारखंडमध्ये बिगरआदिवासी रघुबर दास यांना पक्षानं मुख्यमंत्रिपद दिलं होतं. तर मराठ्यांचं वर्चस्व असलेल्या महाराष्ट्राची धुरा देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आली होती. हरयाणात जाटांचं प्राबल्य असूनही बिगरजाट समुदायातील मनोहरलाल खट्टर यांची भाजपाकडून मुख्यमंत्रिपदी वर्णी लावण्यात आली.हरयाणा, महाराष्ट्र, झारखंडमध्ये स्थानिक बहुसंख्य समुदायातील नेत्यांना डावलून सामाजिकदृष्ट्या फारशी ताकद नसलेल्या समुदायातील नेत्यांना मुख्यमंत्रिपद देणं ही भाजपाची रणनीती आहे का, असा प्रश्न शहांना विचारण्यात आला. त्यावर लोकशाहीत जातीवादापेक्षा कामगिरीला महत्त्व देऊन नेतृत्त्वाची निवड करायला हवी. कोणीतरी त्या दृष्टीनं पावलं टाकायला हवीत. पंतप्रधान मोदींनी त्या दिशेनं काम सुरू केलं आहे. यामुळे कदाचित आम्हाला नुकसान सहन करावं लागू शकतं, अशी भीती अमित शहांनी व्यक्त केली होती. झारखंडच्या निवडणुकीत शहांचं हे विधान खरं ठरल्याचं दिसत आहे.  

टॅग्स :Amit Shahअमित शहाNarendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपा